टेलिव्हिजन अॅक्ट्रेस शिरीन मिर्जाच्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज आहे. तिची तब्येत ठीक नसल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात इंफेक्शन झाल्यामुळे शिरीनला रुग्णालयात दाखल केले आहे. याबद्दलची माहिती शिरीन मिर्जाची जवळची मैत्रीण व अभिनेत्री कृष्णा मुखर्जीने दिली आहे. शिरीन मिर्झा ये है मोहब्बतें मालिकेत रमण भल्लाच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती.
कृष्णा मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शिरीन मिर्जाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. या फोटोतून शिरीन हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं समजतं आहे. कृष्णा मुखर्जी शिवाय स्वतः शिरीन मिर्जाने ती आजारी असल्याचं सांगितलं आहे. तिने इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
ढाई किलो प्रेम, ये है आशिकी, २४, गुटर गू, सावधान इंडिया आणि एमटीव्ही गर्ल्स नाइट आऊट सारख्या मालिकेत तिने काम केले आहे.