Yeh Kaali Kaali Ankhein Season 3 : गेल्या दोन वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेता ताहिर राज भसीन, अभिनेत्री श्वेता त्रिपाठी आणि अंचल सिंह यांच्या 'ये काली काली आंखें'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 2022 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'ये काली काली आंखें' वेबसीरिजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. 'ये काली काली आंखें' वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
'ये काली काली आंखें' या वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. ताहिर राज भसीनने 'ये काली काली आंखे'च्या तिसऱ्या सीझनचं अपडेट दिलं. ताहिर राज भसीन यानं आगामी सीझनचं पोस्टर शेअर केलं आहे.
'ये काली काली आंखें' ही वेबसीरिज अप्रतिम आहे. क्षणभरही स्क्रीनवरून नजर हटवत नाही. प्रत्येक वेळी एक नवा ट्विस्ट आणि टर्न येतो आणि सीरिज झपाट्याने पुढे सरकते. पात्रं आणि त्यांचे रंग झपाट्याने बदलतात आता दोन सुपरहीट सीझननंतर 'ये काली काली आंखे'चा तिसरा सीझन येतोय. हा सीझन एक थरारक रोलर-कोस्टर राईड असणार आहे. लवकरच ही सीरिज कधी प्रदर्शित होणार, याचं अपडेट समोर येईल. जर तुम्ही अद्याप या सीरिजचे दोन्ही सीझन पाहिले नसतील, तर ते नेटफ्लिक्सवर उपल्बध आहेत.