Shivangi Joshi: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 01:38 PM2023-03-16T13:38:53+5:302023-03-16T13:42:44+5:30
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम नायरा उर्फ शिवांगी जोशीचा मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्रीने रुग्णालयातील तिचा बेडवरील फोटो शेअर केल्याने चाहते चिंतेत आहेत.
Shivangi Joshi Kidney Infection: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम नायरा उर्फ शिवांगी जोशीचा मोठा चाहता वर्ग आहे. तिचे चाहते शिवांगीवर खूप प्रेम करतात, परंतु अभिनेत्रीच्या तब्येतीचे अपडेट जाणून चाहते चिंतेते आहेत. शिवांगीने नुकतीच सोशल मीडियावर तिच्या हेल्थसंदर्भात अपडेट करत शेअर केली होती ही वाचून चाहते हैराणा झाले होते. तिला लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत आहेत.
शिवांगी जोशीच्या किडनीना इन्फेक्शन झालं आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टद्वारे तिची हेल्थ अपडेट दिली आहे. फोटोमध्ये शिवांगी हॉस्पिटलच्या बेडवर पडून हसताना दिसत आहे.
शिवांगीची हेल्थ अपडेट
शिवांगीने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, " मला गेल्या काही दिवसांपासून किडनीचा संसर्ग झाला आहे, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझं कुटुंब, मित्र, डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि देवाच्या कृपेने मला बरं वाटत आहे. "तुम्हाला तुमच्या शरीराची आणि मानसिक काळजी घ्यावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला हायड्रेटेड ठेवा. सर्वांना खूप खूप प्रेम, मी लवकरच परत येईन.
शिवांगी जोशीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती 'ये रिश्ता'नंतर 'बालिका वधू 2' आणि 'खतरों के खिलाडी 12'मध्ये दिसलेली शिवांगी जोशी 'बेकाबू'मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये त्याच्यासोबत ईशा सिंग, शालिन भानोट आणि मोनालिसा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा शो कलर्सवर 18 मार्च 2023 रोजी प्रसारित होईल