छोट्या पडद्यावरील अभिनेता मोहसीन खानच्या चाहत्यांना हे वृत्त वाचून त्याची चिंता वाटेल. मोहसीनला डेंग्यू झाला असून त्याने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. मोहसीनने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत कार्तिक गोएंकाची भूमिका साकारतो आहे. या मालिकेतील कार्तिक व नायराची जोडी प्रेक्षकांना खूप भावते आहे.
मोहसीनने ट्विट करत सांगितलं की, मला डेंग्यू झाला आहे. बराच काळ बाहेर राहत असाल तर सावधान रहा. लवकर बरा होईन, इंशाअल्लाह.
मोहसीन खानने त्याच्या करियरची सुरूवात २०१४ साली लव बॉय चान्स मालिकेतून केली होती. त्यानंतर तो कित्येक मालिकेत झळकला आहे. 'मेरी आशिकी तुम से ही', 'निशा और उसके कजिन्स', 'प्यार तूने क्या किया', 'ड्रीम गर्ल: एक लड़की दीवानी सी' या मालिकेत त्याने काम केलं आहे.
सध्या तो 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत काम करतो आहे. या मालिकेनं नुकतेच तीन हजार भाग पूर्ण केले आहेत.