Join us  

हो.. आमिर सनी लिऑन सोबत काम करणार!

By admin | Published: January 20, 2016 3:08 PM

अभिनेता आमिर खानने सनी लिऑनसोबत काम करण्यास संमती दर्शवत तिचे कौतुक केले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनच्या एका मुलाखतीवरून सध्या बरीच गाजत आहे. मुलाखतकार भूपेंद्र चौबे यांनी तिला ठराविक साच्यातील व पूर्वग्रहांवर आधारीत असे प्रश्न विचारल्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार होत असून बॉलिवूड सेलिब्रिटी सनीचे कौतुक करत आहेत. तुझ्या भूतकाळाचा तुला अभिमान आहे का, आणिर खान तुझ्यासोबत काम करेल का? असे प्रश्न विचारत चौबे यांनी तिला विचारल्याने त्यांना अनेकांचा रोष पत्करावा लागला आहे. मात्र असे असतानाच बॉलिवूडचा मि. फरफेक्शनिस्ट खुद्द आमिर खाननेच सनीसोबत काम करण्यास संमती दर्शवली आहे. याप्रकरणी आपल्या फेसबूक पेजवर आमिरने एक पोस्ट लिहीली असून त्यात त्याने खुलेपणाने सनीचे कौतुक केले असून चौबे यांच्या प्रश्नांबद्दल नाराजी दर्शवली आहे. 
' माझ्या मते मुलाखतीदरम्यान सनीने तिची अप्रतिष्ठा होऊ दिली नाही. मुलाखतकाराबद्दलही मला असं म्हटणं आवडलं असतं पण...' ' आणि हो सनी,  मला तुझ्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. जसं त्या मुलाखातकाराला वाटतं तसा तुझ्या 'भूतकाळाबद्दल' मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आनंदी रहा.. आमिर', असे आमिरने त्याच्या पेसबूक पोस्टमध्ये नमूद केले आहे. 
 
 
 
मुलाखतीदरम्यान चौबे यांनी सनीला केवळ तिच्या एकेकाळी पॉर्नस्टार असण्यावर आणि ती काहीशी कमी महत्वाची असल्यासारखे दाखवत काही प्रश्न विचारल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. पण विशेष म्हणजे, सनीने त्या मुलाखतीदरम्यान प्रत्येक प्रश्नाला अत्यंत शांतपणे आणि न डगमगता उत्तरे दिली. तीस मिनिटांच्या मुलाखतीमध्ये वारंवार तिच्या भूतकाळावर प्रश्न विचारण्यात आले तरिही तिने त्याला उत्तरे दिली.
तुमच्या भूतकाळाबद्दल तुम्हाला अभिमान आहे का, आमिर खान तुमच्याबरोबर काम करेल का, बॉलीवूडच्या भाषेत तुम्ही आयटम गर्ल आहात, किती लोकांना पॉर्नस्टार होण्याची इच्छा असते असे प्रश्न विचारल्यामुळे चौबे हे स्त्रीविरोधी असल्याची टीका सर्वत्र होत आहे. मुलाखतकाराचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वाईट असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बॉलीवूडसह टष्ट्वीटरवर व्यक्त झाल्या. मुलाखतकाराच्या या धक्कादायक प्रश्नांवर ऋषी कपूर, आलिया भट्ट, दिया मिर्झा, सुशांत राजपूत, रितेश देशमुख यांनी टीकेची झोड उठविली आहे.