Join us

येस बँकेत अडकले या अभिनेत्रीच्या वडिलांचे २ कोटी रुपये, झाली हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 3:46 PM

या अभिनेत्रीने सरकारकडे मदत मागितली आहे

अभिनेत्री पायल रोहतगी हिने बॉलिवूडमध्ये जितकं नाव कमाविले नाही तेवढे नाव तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून कमविले आहे. नेहमी विविध मुद्द्यांवर आपलं मतं मांडून चर्चेत येणाऱ्या पायलने यावेळी सरकारकडे मदत मागितली आहे. 

जेव्हापासून आरबीआयने येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादल्यामुळे लाखो लोक अडचणीत सापडले आहे. या लोकांमध्ये चित्रपट व टेलिव्हिजनवरील अभिनेत्री पायल रोहतगीचे वडील शशांक रोहतगीच्या नावाचादेखील समावेश आहे. अहमदाबादमधील सुभाष चौक इथल्या येस बँक ब्रांचमध्ये जवळपास दोन कोटी रुपये अडकले आहेत. 

अहमदाबादच्या एका टीव्ही चॅनेलशी बोलताना पायल रोहतगीने सांगितले की, तिच्या वडिलांनी ११ वर्षांपूर्वी गुडगाव येथीस येस बँकमध्ये स्वतःचे खाते सुरू केले होते आणि सात वर्षांपूर्वी अहमदाबाद ब्रँचमध्ये ट्रान्सफर केले होते. रिटायरमेंटनंतर अहमदाबादमध्ये राहत असलेले ७० वर्षीय शशांक रोहतगी मागील काही वर्षांपासून कर्करोग व इतर गंभीर आजाराशी सामना करत आहे.

पायलने पुढे सांगितले की, तिच्या वडिलांसाठी हे वृत्त खूप वाईट आहे. कारण ते आजारांवर उपचार करत आहेत आणि आता पैसे काढण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागतो आहे. 

नुकतेच त्यांनी बँकेतून सगळे पैसे काढून इतर बँकेत जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. पण येस बँकेत जाऊन धनादेश घेणार त्याच्याआधीच आरबीआयने ही घोषणा केली.

इतकेच नाही तर पायलने हे देखील सांगितले की, तिच्या वडिलांनी येस बँकेच्या या समस्येबद्दल ऐकले होते आणि कोणत्यातरी इतर बँकेत त्यांचे खाते ट्रान्सफर करण्यासाठी इच्छुक होते. परंतु बँकेकडून नेहमीच सल्ला दिला आणि सांगितले की, आता परिस्थितीवर नियंत्रण आले असून काहीच गडबड होणार नाही.

पायलने येस बँकेच्या वृत्तानंतर एक ट्विट केले ज्यात तिने पंतप्रधान कार्यालयासोबत गृह मंत्रालयाला देखील टॅग केले आहे आणि दोघांकडून मदत मागितली आहे.

टॅग्स :पायल रोहतगीबिग बॉस