Join us

हनी सिंहचे वाढले आहे कित्येक किलो वजन, त्याला ओळखणेही होतेय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 5:02 PM

हनी सिंहला नुकतेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शन पार्टीत पाहायला मिळाले. या रिसेप्शन पार्टीतील हनीचा लूक पाहाता त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते.

ठळक मुद्देदीपिका आणि हनी सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहेत. कॉकटेल या चित्रपटापासून त्यांची दोस्ती आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात हनी सिंगने गायलेले आणि दीपिका, शाहरुख खानवर चित्रीत झालेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच गाजले होते. हनी सिंग दापिका, रणवीरच्या रिसेप्शनमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून आला होता. या पार्टीत तो खूप छान मुडमध्ये दिसला. त्याने या पार्टीत खूप धमाल मस्ती केली. तसेच खूप सारे फोटो काढले. 

रॅपर हनी सिंह गेल्या काही काळापासून लाईम लाईटमध्ये नाही. पण तरीही त्याची फॅन फॉलोर्इंग कमी झालेली नाही. हनी सिंहला नुकतेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या रिसेप्शन पार्टीत पाहायला मिळाले. या रिसेप्शन पार्टीतील हनीचा लूक पाहाता त्याला ओळखणे देखील कठीण झाले होते.

दीपिका आणि हनी सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहेत. कॉकटेल या चित्रपटापासून त्यांची दोस्ती आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटात हनी सिंगने गायलेले आणि दीपिका, शाहरुख खानवर चित्रीत झालेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच गाजले होते. 

हनी सिंग दापिका, रणवीरच्या रिसेप्शनमध्ये काळ्या रंगाचे कपडे घालून आला होता. या पार्टीत तो खूप छान मुडमध्ये दिसला. त्याने या पार्टीत खूप धमाल मस्ती केली. तसेच खूप सारे फोटो काढले. 

हनी सिंह काही महिन्यांपूर्वी चांगलाच वादात सापडला होता. सुमारे दीड वर्षं योयो बॉलिवूडमधून पुरता गायब झाला होता. यादरम्यान त्याच्याबद्दल नाही नाही त्या अफवांचे पीक आले होते. पण यानंतर एका मुलाखतीत या काळात त्याच्यासोबत काय काय घडले, हे हनीने जगासोबत शेअर केले होते. बॉलिवूडमधून काही काळ मी गायब होतो. बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरू होती. यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबूल केले होते. बायपोलर डिआॅर्डरमध्ये रूग्णाचे मूड क्षणाक्षणाला बदलतात. कधी पराकोटीचा आनंद तर कधी घोर निराशा, असे त्यांचे मूड असतात. याच आजारामुळे हनीसिंह इतका मद्याच्या आहारी गेला की, त्याला हे व्यसन सोडवण्यासाठीही उपचार घ्यावे लागले होते. पण आता हनी पुन्हा नव्या आत्मविश्वासाने परतला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

 

टॅग्स :हनी सिंह