&TV वरील मालिका 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये योगेश त्रिपाठी साकारत असलेल्या दरोगा हप्पू सिंग पहिल्यांदा तो 'भाबीजी घर पर है' मध्ये मजेशीर ढेरपोट्या, भ्रष्ट दरोगाच्या भूमिकेत दिसला होता. या भूमिकेने प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य आणले. या भूमिकेला खूपच लोकप्रियता मिळाली आणि पुढे ही भूमिका प्रेक्षकांच्या आवडीची बनली. यामधूनच योगेशला त्याची स्वत:ची मालिका 'हप्पू की उलटन पलटन'मध्ये त्याचे कुटुंब व संपूर्ण पलटनप्रती दरोगाच्या जबाबदा-या पार पाडणा-या त्याच्या भूमिकेची दुसरी बाजू सादर करायला मिळाली.
विनोदी भूमिका साकारणे सोपे वाटत असेल, पण आवडीची आयकॉनिक भूमिका बनण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. या अभिनेत्याला टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. दोन लोकप्रिय मालिकांमध्ये दीर्घकाळापर्यंत काम करताना अभिनेता बुंदेलखंदी भाषा बोलण्यामध्ये पटाईत झाला. याव्यतिरक्त त्याच्या आकर्षक लुकला साजेसे असे त्याचे सिग्नेचर पोटबेली, भूमिकेला पूर्ण करण्यासाठी बनावटी फ्लॅब जोडण्यात आले आहे. अभिनेत्याने नुकतेच या भूमिकेमागील प्रेरणेबाबत आणि या भूमिकेचा वैविध्यपूर्ण स्वभाव अवगत करण्यामध्ये मदत केलेल्या व्यक्तीबाबत सांगितले. ती व्यक्ती योगेशचे थिएटर गुरू आहेत.
अभिनेता योगेश त्रिपाठी म्हणाला, ''हप्पूची भूमिका ही माझ्या अभिनय करिअरचे आकर्षण आहे. मला ही भूमिका साकारायला आवडते. दीर्घकाळापर्यंत बनावटी फ्लॅब परिधान करून शूटिंग करणे त्रासदायक असले तरी या भूमिकेसाठी मिळालेले प्रेम व प्रशंसा त्या त्रासाला दूर करतात. अनेकांना माहित नाही की, माझ्या रंगभूमीच्या दिवसांमध्ये माझे गुरू होते. त्यांचे नाव प्रेमचंदजी आहे. त्यांच्यामध्ये हप्पूसारखेच साम्य आहे. खासकरून पोटबेली आणि वागण्याची पद्धत. मला त्यावेळी माहित नव्हते की, काही वर्षांनंतर मी त्यांच्यासारखीच भूमिका साकारेन. मला हप्पूची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तेव्हा मी भूमिकेचा स्वभाव आत्मसात करण्यासाठी प्रेरणास्रोत म्हणून त्यांची आठवण काढली. प्रेमचंदजी आता आमच्यामध्ये नसले तरी मी माझ्या भूमिकेमधून त्यांना जिवंत ठेवले आहे.''