Join us

बंदे में हैं दम! ‘ख्वाडा’द्वारे रांगड्या भाऊ शिंदेचे पदार्पण

By admin | Published: October 13, 2015 11:54 PM

एक खेडूत तरुण शेती करीत असताना, अचानकपणे ‘फिल्म मेकिंग’चे शिक्षण काय घेतो, मित्राला मदत करण्यासाठी, सहाय्यक दिग्दर्शक बनतो आणि पुढे त्या चित्रपटाचा नायक म्हणून पुढे येतो काय

एक खेडूत तरुण शेती करीत असताना, अचानकपणे ‘फिल्म मेकिंग’चे शिक्षण काय घेतो, मित्राला मदत करण्यासाठी, सहाय्यक दिग्दर्शक बनतो आणि पुढे त्या चित्रपटाचा नायक म्हणून पुढे येतो काय? सारेच विलक्षण! ‘ख्वाडा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अस्सल मऱ्हाटी बाज असलेला ‘भाऊसाहेब’ हा नवा चेहरा मराठी चित्रसृष्टीत दाखल होत आहे.‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अस्सल मऱ्हाटी रफ अ‍ॅण्ड टफ चेहरा ‘भाऊसाहेब’च्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीला सापडला आहे. कणखर पीळदार शरीरयष्टी असणारा भाऊ शिंदे याच्या अभिनयाची जातकुळी अत्यंत वेगळी असून तरुण वर्गात त्याची क्रेझ होऊ लागली आहे. सोशल मीडियात भाऊ लोकप्रिय होऊ लागला आहे. ग्रामीण ठसका आणि रांगडेपणा याची नजाकत असणारा त्याचा नायक २२ आॅक्टोबरला मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘भाऊ’च्या या पहिल्याच प्रयत्नावर प्रभात पुरस्काराची मोहोर उमटली आहे.‘ख्वाडा’च्या नायकासाठी अनेक आॅडिशन्स झाल्या, पण कोणताही चेहरा पसंत पडत नव्हता आणि अचानक कऱ्हाडे यांचे ६४ किलो वजनाच्या भाऊसाहेबवर लक्ष गेले. कऱ्हाडे भाऊसाहेबला म्हणाले, शूटींग सुरु होईपर्यंत पुढच्या एका महिन्यात तुझे वजन ७५ किलो झाले, तर ‘बाळू’ची भूमिका तुला मिळेल. भाऊसाहेबाने तब्बल ७७ किलोपर्यंत वजन वाढविले आणि महाराष्ट्राला मिळाला नवा नायक ‘बाळू’ अर्थात भाऊ शिंदे. भाऊ या भूमिकेविषयी म्हणाला, ‘मी ‘ला स्ट्राडा’ हा फ्रेडेरीको फेलीनीचा चित्रपट पहिला होता आणि त्यातील ‘जेलेटा मसिना’चा अभिनय आणि तरलपणा मला भावला होता. त्याचाच मला ही व्यक्तिरेखा साकारताना उपयोग झाला.’ दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, की प्रेक्षकांना जे हवे आहे, ते देणाऱ्या या चित्रपटामध्ये भाऊसाहेबाने व्यक्तिरेखेचे आव्हान लीलया पेलले असून, त्याने कोणतीही कसर सोडली नाही त्याची ही भूमिका पाहून प्रेक्षकच म्हणतील बंदे में हैं दम!