Join us

'या लढाईत तू एकटी नाहीस', कंगना राणौतनंतर पायल घोषला मिळाले शर्लिन चोप्राचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 3:43 PM

अभिनेत्री पायल घोषने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तिने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हे आरोप समोर आल्यानंतर त्याचे समर्थन करण्यासाठी हुमा कुरेशी, तापसी पन्नू, कल्की कोचलिन, अंजना सुखानी आणि सुरवीन चावला यासारख्या इतर अभिनेत्री पुढे सरसावल्या आहेत. त्यानंतर आता अभिनेत्री पायल घोषला पाठिंबा देण्यासाठी शर्लिन चोप्राने पुढाकार घेतला आहे.

शर्लिन चोप्राने ट्विटरवर लिहिले की, "प्रिय पायल घोष, कृपया तू या लढाईत एकटी आहे असे समजू नकोस. सर्वजण ज्यांना सत्यतेची आणि अखंडतेची किंमत आहे ते सर्व तुमच्यासोबत आहेत. ते म्हणतात - पायल यांना तक्रार नोंदवण्यासाठी.एवढी वर्ष का लागली. ठीक आहे, खूप वेळ लागतो असे अनुभव जाहीर करायला. हे सोपे नाही आहे.

शार्लिन चोप्राने पुढे ट्विट केले की, "एखाद्या स्त्रीला अनुचित घटनेची नोंद केव्हा करावी लागेल हे सांगणे हास्यास्पद आहे. वर्षानुवर्षे प्रकरण नोंदवण्यामुळे सत्य असत्य ठरते काय? मी कंगनाचे आभार मानते की आम्हाला सत्य बोलण्यास प्रोत्साहित केले. पायल घोषने ट्विट करून शर्लिन चोप्राचे तिला समर्थन दिले त्यासाठी आभार मानले आहेत. 

काय आहे हे प्रकरणआईएएनएसला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री पायलने 2014 मधील घटनेविषयी खुलासा केला आहे. पायलने सांगितले की, 2014 मध्ये अनुराग कश्यपने माझा विनयभंग केला. दिग्दर्शकाने मला सांगितले की, त्याच्यासोबत काम करणार्‍या मुली त्याच्याबरोबर 'गाला टाइम' घालवतात. पायल म्हणाली की, अनुराग त्यावेळी बॉम्बे वेलवेटवर काम करत होता. रणबीर कपूरबरोबर फक्त एकच चित्रपट करण्यासाठी मुली त्याच्याबरोबर झोपायला तयार असल्याचेही कश्यपने तिने सांगितले. यानंतर, अनुरागने एक प्रौढ चित्रपट दाखवण्यास सुरूवात केली. मला भीती वाटायला लागली. यानंतर, तो अचानक माझ्या समोर नग्न झाला आणि मला माझे कपडे काढण्यास सांगितले. मी म्हणाले सर मला काही कंफर्टेबल नाही वाटत असे सांगितले असल्याचा खळबळजनक खुलासा पायलने केला.

ती पुढे म्हणाली की, अनुरागने सांगितले की मी काम केलेल्या अभिनेत्री फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यास तयार आहेत. मग मी पुन्हा म्हणाले की, मला कंफर्टेबल नाही वाटत आणि मी आजारी आहे. कसं तरी मी तिथून पळाले. यानंतर मी त्याला कधीच भेटले नाही. त्याने मला बर्‍याच वेळा भेटण्यास सांगितले. मी आजपर्यंत ती घटना विसरू शकले नाही आणि यामुळे मला खूप त्रास होतो, असं पायलने सांगितलं असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे.

टॅग्स :अनुराग कश्यपशर्लिन चोप्रा