कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. २००३ साली तिने बूम सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सुरूवातीला तिला खूप टीकेचा सामना करावा लागला मात्र नंतर हळूहळू तिला यश मिळू लागले आणि आता ती इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजविते आहे. आता भलेही ती प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिला सुरूवातीच्या काळात खूप स्ट्रगल करावा लागला होता. एकदा एका मुलाखतीत कतरिना कैफने खुलासा केला होता की, अनुराग बसूच्या सुपरहिट सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. एवढंच नाही तर तिने सिनेमातील सीन शूटदेखील केला होता. या सिनेमात जॉन अब्राहमदेखील होता.
कतरिना कैफला अभिनेत्री तारा शर्माने रिप्लेस केले होते. जॉन अब्राहम आणि तारा शर्मा अभिनीत सिनेमाचं नाव आहे साया. चित्रपट फ्लॉप झाला पण गाणी सुपरहिट ठरली होती. ताराने नंतर ओम जय जगदीश, मस्ती या सिनेमासह काही सिनेमात काम केले. त्यानंतर ती सपोर्टिंग आणि लहान-मोठ्या भूमिकेत पाहायला मिळाली. आज ती ४८ वर्षांची आहे. शेवटची ती द आर्चीजमध्ये दिसली होती.
कतरिना कैफनं सांगितली आपबीतीबॉलिवूड बबलला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत कतरिना कैफ म्हणाली होती, मला साया चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. नाही, याला काढले असे म्हणता येणार नाही, पण मला रिप्लेस केले गेले. जॉन अब्राहम आणि तारा शर्मा यांच्या मुख्य भूमिका असलेला हा अनुराग बसूचा चित्रपट होता. मी फक्त एक शॉट दिला, एक दिवस नाही, फक्त एक शॉट दिला. त्यावेळी मला वाटले की माझे आयुष्य संपले आहे. मला वाटले माझे करिअर संपले आहे.
कलाकाराला नकाराचा सामना करावा लागतो...कतरिना कैफ पुढे म्हणाली, एक कलाकार म्हणून प्रत्येकाला नकाराचा सामना करावा लागतो. कदाचित प्रत्येकालाच नाही, परंतु बहुतेक कलाकारांना नकाराचा सामना करावा लागतो आणि अनेक वेळा ऐकावे लागते. म्हणून जर तुम्हाला कलाकार व्हायचे असेल तर तुम्हाला ती सहनशीलता विकसित करावी लागेल. कतरिना कैफ पुढे म्हणाली, जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा लोक मला म्हणाले, तू अभिनेत्री बनू शकत नाहीस आणि तुझ्यात काही चांगले नाही. मी तेव्हाही रडले होते., त्यावेळी रडणे त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करते. पण मग तुम्ही तुमच्या ध्येयाला चिकटून राहा, कठोर परिश्रम करा आणि तुम्हाला धीर धरावा लागेल.
'साया' सिनेमाबद्दल...
'साया' २००३ मध्ये रिलीज झाला होता. २००२ मध्ये आलेल्या 'ड्रॅगनफ्लाय' या हॉलिवूड चित्रपटाचे हे रूपांतर होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते आणि महेश भट यांनी निर्मिती केली होती. जॉन अब्राहम आणि तारा शर्मा यांच्याशिवाय महिमा चौधरी, जोहरा सहगल आणि राजेंद्रनाथ जुत्शी यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.