Join us

बॉलिवूडमधून आमिर खानची ही अभिनेत्री झाली गायब, आता तिला ओळखणं ही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 19:07 IST

करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला.

ऑस्कर नॉमिनेटेड चित्रपट 'लगान' सिनेमातून ग्रेसी सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानतंर ती अरमान, गंगाजल, मुन्नाभाई एमबीबीएस, मुसकान, शर्त, वजह, ये है जिंदगी, द वाइट लैंड, चूड़ियां, लख परदेसी होइए या चित्रपटात काम केले. मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली. एकामागून एक तिचे सिनेमा फ्लॉप झाले. तिला सिनेमात काम मिळणं कठीण झालं. मात्र करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला. काही वर्षांपूर्वी मालिका जय संतोषी माँमध्ये संतोषी देवीच्या भूमिकेत दिसली होती. तसेच ग्रेसी सिंग शेवटची २०१५ साली पंजाबी सिनेमा चुडियामध्ये दिसली होती.

ग्रेसी त्या अभिनेत्रींपैकी आहे जिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख बनवली. लगान चित्रपटात ग्रेसीने गावातील तरूणीची भूमिका केली होती. तिच्या या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतूकही झाले होते.

पहिल्याच चित्रपटात सर्वोत्कृष्ट पदार्पणाच्या पुरस्कारावर आपली मोहोर उमटवित तिने दिग्दर्शक व प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. ग्रेसीचा जन्म १९८० साली दिल्लीत झाला. तिचे वडील स्वर्ण सिंग प्रायव्हेट कंपनीत कार्यरत होतो. तिची आई परजिंदर कौर एक शिक्षिका होत्या.  

टॅग्स :ग्रेसी सिंग