Join us

कंगणा राणौतने साधला तापसी पन्नूवर निशाणा म्हणाली "तू नेहमी स्वस्तच राहणार" !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 4:46 PM

कंगणाचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे. तुम्ही निर्दोश आहात असे वाटत असेल स्वतःला सिद्ध करुन दाखवा, कोर्टात जा. तेथून क्लिन चीट मिळवा असे म्हटले आहे.

आयकर विभागाने ३ मार्च रोजी म्हणजेच बुधवारी टॅक्स चोरी प्रकरणात निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर छापे टाकले. शुक्रवारी उशीरा रात्री पर्यंत अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूशी ३५० कोटी कर चोरीच्या प्रकरणी चौकशी केली. शिवाय तापसीच्या नावावर पाच कोटींच्या रोख रकमेची पावती मिळाल्याचं देखील विभागाने स्पष्ट केलं. यासर्व प्रकारावर तापसीने शनिवारी ६ मार्च रोजी मौन सोडत उत्तर दिलं. तिने एकापाठोपाठ तीन ट्वीट करत तिची बाजू मांडली. तिने ट्वीटमध्ये मी आता स्वस्त राहिली नाही सांगत ट्विट केले होते. 

ट्विटच्या माध्यमातून तापसीने कंगना रणौतवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता त्यावर कंगनानेही ट्विट करत तिला प्रत्युत्तर दिलं आहे. 'तू नेहमी स्वस्तच राहणार म्हणत तिने अनुराग कश्यपवरही निशाणा साधला आहे. सध्या कंगणाचे हे ट्विट तुफान व्हायरल झाले आहे. तुम्ही निर्दोश आहात असे वाटत असेल स्वतःला सिद्ध करुन दाखवा, कोर्टात जा. तेथून क्लिन चीट मिळवा. कमऑन सस्ती'

तुर्तास आयकर विभागाच्या कारवाईनंतर तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे तापसी आणि तिचे कुटुंबीय नाराज आहेत. दरम्यान तापसीने तीन ट्वीट करून आपली बाजू माडण्याचा प्रत्न केला.तापसी पन्नूने केलेल्या ट्विटवरुन स्पष्ट होते की कोणत्या तीन गोष्टींच्या आधारावर तिच्या घरावर छापे टाकण्यात आली होती. तिने ट्विट्सच्या माध्यमातून तिच्यावर करण्यात आलेले आरोपांत तथ्य नसल्याचे सांगितले आहे. सध्या आयटी विभागाची तपासणी कुठपर्यंत पोहचली आहे आणि त्यांचा काय निष्कर्ष आहे, हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे.

'आता मी स्वस्त राहिलेले नाही', आयकर विभागाच्या छापेमारीवर अखेर तापसी पन्नूने सोडले मौन

पहिल्या पोस्टमध्ये तापसी पन्नूने ट्विटमध्ये लिहिले की, तीन दिवस केलेल्या कसून चौकशीतून तीन गोष्टी समोर आल्या आहेत. पॅरिसमधील ज्या कथित बंगल्याची चावी माझ्याकडे असल्याचे बोलले जात आहे, ज्याची मी स्वतः मालकीण आहे. तिथे मी कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलेले नाही.

टॅग्स :कंगना राणौततापसी पन्नू