Join us

तुमची स्टाइल हे तुमचे रिफ्लेक्शन असते - क्रांती रेडकर

By admin | Published: January 13, 2017 5:32 AM

तुमची स्टाइल तुम्ही जसे आहात त्याचे एक रिफ्लेक्शन असते. तुमच्या स्टाइलवरून तुमचा मूड कसा आहे

तुमची स्टाइल तुम्ही जसे आहात त्याचे एक रिफ्लेक्शन असते. तुमच्या स्टाइलवरून तुमचा मूड कसा आहे, तेही कळतं. त्यामुळे जसे तुम्ही आतून आहात तेच जास्त रिफ्लेक्ट करायचा प्रयत्न तुमच्या स्टाइलमधून केला पाहिजे. तीच खरी स्टाइल असल्याचे माझे मत आहे. मला कुठेच स्टाइल स्टेटमेंट मांडण्यासाठी स्टाइल करायला आवडत नाही. कुणा एकाची ड्रेसिंग स्टाइल कॉपी करणे त्याचप्रकारचे ड्रेसिंग करीत रेड कार्पेटवर येणे मुळात मला हे आवडत नाही. माझ्यासाठी सिंप्लिसिटी ही एक स्टाइल आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जी स्टाइल करता ती आत्मविश्वासाने कॅरी करणे गरजेचे आहे. मला अनेकांची स्टाइल आवडतात. कोंकणा सेन-शर्मा, विद्या बालनची साड्यांची स्टाइल आवडते. सध्याची सगळ्यांची फेव्हरेट स्टाइल आयकॉन सोनम कपूरची स्टाइलही मला आवडते. आलिया भट्टचाही उल्लेख करायला आवडेल, कारण तिची ड्रेंसिग स्टाइलही उत्तम असते. बिर्इंग आॅल वेस्टर्न इज नॉट अ मॉडर्न, विचाराने मॉडर्न होणे गरजेचे आहे. तसेच स्वत:च्या बॉडीविषयी कॉन्शिअस होऊ नका, मला हे सूट नाही होणार, हा रंग मला सूट होईल का, असा कॉन्शिअसनेस बाळगू नका. तुम्ही जर कॉन्शिअस असलात तर तुम्ही कोणताही ड्रेस घाला तो तुम्ही चांगला कॅरी करू शकणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, तुमचे फुटवेअर आणि तुमचे घड्याळ तुमचे व्यक्तिमत्त्व दाखवत असते. या दोन्ही गोष्टींना महत्त्व द्या. आज जरी मोबाईलमध्ये वेळ कळत असली तरीही मोठ्यातल्या मोठ्या ब्रँडच्या घड्याळ आजही मार्केटमध्ये आहेतच आणि खूप महागडे ब्रँडचे घड्याळ आजही विकले जातात. सो नेहमी माझ्या स्टाइल स्टेटमेंटमध्ये फुटवेअर आणि घड्याळ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शाहीद कपूर, रणबीर कपूर, अक्षय खन्नाचा भाऊ राहुल खन्ना या लोकांच्या स्टाइल खूप वेल प्रेझेंटेड असते.