बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची त्या काळात खूप लोकप्रियता होती. आपल्या जबरदस्त अभिनयासाठी त्यांना तीनदा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. या पुरस्कारांसाठी ते १४ वेळा नॉमिनेट झाले होते. १८ जुलै २०१२ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे काही किस्से आजही चर्चेत असतात.
सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता मेहमूद यांचा एक किस्सा खूप गाजला होता. ज्यावेळी हे दोघे 'जनता हवलदार' सिनेमासाठी एकत्र काम करत होते. या चित्रपटासाठी मेहमूद यांनी राजेश खन्ना यांना कास्ट केलं होतं.
एक दिवस मेहमूद त्यांच्या फार्म हाउसवर सिनेमाचं शूटींग करत होते. तिथे मेहमूद यांचा मुलगा राजेश खन्ना यांना भेटला आणि हाय-हेलो करून सरळ निघून गेला. राजेश खन्ना नाराज झाले होते. तो फक्त त्यांना हेलो करून कसा गेला याचा त्यांना राग आला होता. त्यानंतर राजेश खन्ना सेटवर उशीरा येऊ लागले. त्यांच्या उशीरा येण्यामुळे शूटिंगचा खेळखंडोबा होऊ लागला.