Join us

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम, 23 एप्रिलला नाही रिलीज होणार 'बंटी और बबली 2'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 4:47 PM

'हाथी मेरे साथी' नंतर 'बंटी और बबली 2' ची रिलीज डेट पुढे ढकलल्याची बातमीसमोर आली आहे.

हाथी मेरे साथी' नंतर 'बंटी और बबली 2' ची रिलीज डेट  पुढे ढकलल्याची बातमीसमोर आली आहे. असं म्हणतात की, पुढच्या महिन्यात 23 एप्रिलला रिलीज होणाऱ्या 'बंटी और बबली 2'ची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसची लाट पुन्हा एकाद सगळीकडे आली आहे. बॉलिवूडवरही कोरोना सकंट आहे.

तरण आदर्श यांनी ट्विटद्वारे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याची माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे, 'बंटी और बबली जो 23 एप्रिल 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, त्याची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे. यश राज फिल्म्सकडून लवकरच एक नवीन तारीख जाहीर केली जाईल.

2005मध्ये आलेल्या 'बंटी और बबली'चा हा सीक्वल आहे. यात सैफ अली खान, राणी मुखर्जी, गली बॉय’चा स्टार सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. एका नव्या दिग्दर्शकालाही या चित्रपटाद्वारे लॉन्च केले जाणार आहे. वरूण शर्मा ‘बंटी और बबली 2’चे दिग्दर्शन करणार आहे. वरूणने याआधी सुल्तान व टायगर जिंदा है यासारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. आदित्य चोप्रा ‘बंटी और बबली 2’चा निर्माता असेल.

टॅग्स :सैफ अली खान राणी मुखर्जी