Join us

सुशांतच्या मृत्यनंतरही शौविक चक्रवर्तीने ड्रग्स खरेदी केले, ड्रग्स पेडलरने केले उघड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 6:38 PM

सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण आता खून, आत्महत्येपेक्षा ड्रग्स रॅकेट बनले आहे.

सुशांत सिंग राजपूतचे प्रकरण आता खून, आत्महत्येपेक्षा ड्रग्स रॅकेट बनले आहे. सीबीआयसोबत नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी), ईडीसुद्धा या प्रकरणात रोज नवं खुलासे करते आहे. रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी शुक्रवारी (4 सप्टेंबर) एनसीबीने धाड टाकली आहे

टाईम्स नाउच्या रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेला ड्रग्स पेडलर जैद विलात्राने चौकशी दरम्यान कबूल केले की, जुलै महिन्याच्या अखेरिस सॅम्युअल मिरांडाला ड्रग कंसाइनमेंट दिले, ज्यासाठी शौविक चक्रवर्तीने पैसे दिले.

 

जैद कॅश घ्यायचा, अब्दुलला करायचा गुगल पे

टाईम्स नाउच्या रिपोर्टनुसार, एनसीबीशी संबंधित लोकांनी सांगितले की जैदने सुशांतच्या मृत्यूनंतरही सॅम्युअलला कंसाईनमेंट दिल्याचे सांगितले आहे. जैदने सांगितले त्याला पैसे शौविकने कॅशमध्ये दिले. चौकशीत जैदने सांगितले तो कॅशमध्ये पैसे घ्यायचा तर अब्दुल बासितला तो गूगल पेने पैसे द्यायचा. कंसाईनमेंट सॅम्युअलला दिले जायचे. यासाठी अनेक वेळा सॅम्युअल कॅशने पैसे पाठवायचा. 

सुशांत - रिया टेरेसवर जाऊन स्मोक करायचे रिपोर्टनुसार, सीबीआयला दिलेल्या जबाबात श्रुतीने सांगितले की, रिया आणि सुशांत दोघेही गांजा एकत्र घेत असत. सुशांत आणि रिया बर्‍याचदा गांजा ओढण्यासाठी टेरेसवर जायचे. रिपोर्टनुसार रिया आपला भाऊ शौवित आणि सॅम्युअल मिरांडसोबत सुद्धा स्मोक करायची. श्रुती मोदी असेही म्हणाले की, ड्रग्स सुशांतच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग होता आणि तो याच्या आधीन गेला होता. श्रुती म्हणाली की रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक आणि त्याचा कर्मचारी ड्रग्जमध्ये गुंतले होते. तिला या सर्व गोष्टींचा भाग बनण्यास जबरदस्ती केली जायची.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत