महिला वर्गात तुफान लोकप्रिय असलेल्या कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’ (Home Minister). या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. गेल्या १९ वर्षांपासून ‘होम मिनिस्टर’चा प्रवास सुरु आहे. या प्रवासात आदेश बांदेकर (adesh bandekar) यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. शहरापासून खेडेगावांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला त्यामुळे त्याची क्रेझ तुफान आहे. यामध्येच आता हा कार्यक्रम परदेशवारी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या सोशल मीडियावर Zee Chitra Gaurav 2023 या पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आदेश बांदेकर यांनी होम मिनिस्टर परदेशात जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
'लोकमत फिल्मी'वर Zee Chitra Gaurav 2023 या पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर रेड कार्पेटवर दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या वर्षभरात कोणती बातमी गाजावी असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत आदेश बांदेकरांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे.
''चर्चा होणार, बातमी गाजणार असं म्हटलं जातंय. त्यामुळे या वर्षभरात तुमच्याविषय़ी कोणती बातमी आम्हाला गाजताना दिसणार आहे?" असा प्रश्न आदेश बांदेकरांना विचारण्यात आला. 'त्यावर, मला ती बातमी ओरडून सांगाविशी वाटते. कारण, गेली १९ वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम महाराष्ट्रात आहे. यावर्षात हा कार्यक्रम परदेशात जाणार आहे.म्हणजे जावा अशी जर बातमी आली तर आणि कल्याणी मॅडमने मनावर घेतलं तर ही बातमी खऱ्या अर्थाने जगभर गाजणार", असं उत्तर आदेश बांदेकरांनी दिलं.
आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या घराचे Inside Photos
दरम्यान, आदेश बांदेकरांनी दिलेल्या या उत्तरामुळे आता खरोखर होम मिनिस्टर सातासमुद्रापार रंगणार का? ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा हा कार्यक्रम चर्चेत आला आहे.