Join us

'झी टॉकीज'ने महाराष्ट्र दिनाची रांगोळीतून दिली मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 09:00 IST

आपल्या महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीला मानवंदना देणारे, त्यांचे जतन करणारे उपक्रम सुद्धा झी टॉकीजच्या माध्यमातून घडत असतात.

'झी टॉकीज' ही वाहिनी, मराठी चित्रपट प्रदर्शित करणारी सर्वाधिक लोकप्रिय वाहिनी आहे. विविध धाटणीचे उत्तमोत्तम चित्रपट झी टॉकीजवर नेहमीच पाहायला मिळतात. म्हणूनच प्रेक्षकांची या वाहिनीला नेहमी पहिली पसंती असते. प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट दाखवण्याव्यतिरिक्त इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टी झी टॉकीज करत असते. आपल्या महाराष्ट्रातील मराठी संस्कृतीला मानवंदना देणारे, त्यांचे जतन करणारे उपक्रम सुद्धा झी टॉकीजच्या माध्यमातून घडत असतात. असाच एक नवा उपक्रम येत्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, म्हणजे बुधवार १ मे रोजी हाती घेण्यात आला आहे.

नवी मुंबई परिसरातील सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल मध्ये एक भव्यदिव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. ६० फूट बाय ४० फूटक्षेत्रफळ असलेली ही रांगोळीमहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, आजवर काढलेली सर्वात मोठी रांगोळी असणार आहे. महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, सिनेसृष्टी गाजवणारे मराठी कलाकार, मराठी संस्कृतीचे निरनिराळे पैलू अशा गोष्टी या रांगोळीत पाहायला मिळतील. गुणवान कलाकारांनी परिपूर्ण असा 'रंगरेषा' ग्रुपही रांगोळी काढणार आहे. महाराष्ट्र दिनाची ही आगळीवेगळी मानवंदना साऱ्यांसाठीच मुख्य आकर्षण असणार आहे.

या रांगोळीत काढण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदारअसेल. याशिवाय 'गेट वे ऑफ इंडिया' आणि आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पादेखील या रांगोळीत असणार आहे. मराठी कला आणि संस्कृती यांचे प्रतीक असणारी लावणी, ढोल अशा गोष्टींचा सुद्धा या रांगोळीत समावेश केला जाणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील काही कलाकारांची प्रतिमा या रांगोळीत समाविष्ट करण्यात येणार आहे. यात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अशा दिग्गजांसह सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी अशा सौंदर्यवती, सिद्धार्थ जाधव हा दमदार अभिनेता यांच्या प्रतिमा असणार आहेत. महाराष्ट्र दिनी, 'झी टॉकीज' देत असलेली ही रांगोळीच्या रूपातील मानवंदना पाहायला सीवूडच्या ग्रँड सेंट्रलमॉलला नक्की भेट द्या.

टॅग्स :महाराष्ट्र दिनरांगोळी