Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' वक्तव्यामुळे संतापला होता झीनत अमान यांचा लेक; बॅट घेऊन निघाला होता मित्राला मारायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 09:12 IST

Zeenat Aman: झीनत अमान यांनी त्यांच्या लेकाविषयी एक जुना किस्सा शेअर केला आहे. यात त्यांचा मुलगा रागाच्या भरात मित्राला बॅटने मारायला निघाला होता.

बॉलिवूडची ग्लॅमरस क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे झीनत अमान (Zeenat Aman).  उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर त्यांनी ८० चा काळ गाजवला. विशेष म्हणजे आजही त्यांचे सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. त्याकाळच्या टॉप अॅक्ट्रेसमध्ये झीनत यांचं नाव अग्रस्थानावर घेतलं जातं. त्यामुळे या अभिनेत्रीच्या प्रोफेशनल लाइफविषयी जवळपास साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, पर्सनल आयुष्याविषयी फारसं कोणाला माहित नाही. झीनत अमान यांना दोन मुलं असून त्यांनी नुकतंच त्यांच्या एका मुलाविषयीचा किस्सा शेअर केला आहे. लहान असताना त्यांच्या लेकाने एका मुलाला चक्क मारलं होतं. विशेष म्हणजे या मारामारी करण्यामागे सुद्धा एक कारण होतं.

झीनत अमान  सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर त्या त्यांच्याविषयीचे अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात नुकतीच (२ मार्च) त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचा बालपणीचा फोटो शेअर केला होता. सोबतच त्याच्या लहानपणीचा एक किस्साही सांगितला. 

काय आहे झीनत अमान यांची पोस्ट?

"माझ्या मुलांना लहानाचं मोठं करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. ज्यावेळी माझी मुलं शाळेत जायला लागली होती. त्यावेळी मी लाइमलाइटपासून दूर झाले होते. पण, तरी सुद्धा कधीतरी टीव्हीवर, वृत्तपत्रांमध्ये ते माझ्याविषयी चुकीच्या पसरणाऱ्या बातम्या ते पाहायचे", असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं. सोबतच एक जुना किस्साही शेअर केला. 

"९० च्या दशकात बांद्र्यांमध्ये दुपारच्यावेळी माझा मुलगा बिल्डिंगमधील एका मित्रासोबत खेळत होता. बराच वेळ झाला तरी ते दोघंही घरी परतले नव्हते. त्यामुळे मी त्यांची वाट पाहात होते. अचानक माझा मुलगा रडत रडत घरात आला. मला काही समजलंच नाही की हा का रडतोय. घरी आल्यावर त्याने त्याचं हेल्मेट काढलं, त्याचं बॅटिंग पॅड बांधले आणि त्याची क्रिकेटची बॅट उचलून तो पुन्हा बाहेर जायला निघाला. बाहेर जाण्यापूर्वी त्याने बॅट हवेत फिरवली आणि उदास होऊन तुझ्याविषयी वाईट वक्तव्य करणाऱ्यांचा बदला घ्यायला चाललोय असं सांगितलं. त्याच्या कोणत्यातरी मित्राने माझ्याविषयी चुकीचं भाष्य केलं होतं", असं झीनत अमान म्हणाल्या.

पुढे त्या सांगतात, "जर तो इतका बैचेन दिसला नसता तर मी नक्कीच त्याच्या नकट्या रागावर हसले असते. पण, त्याचा आक्रोश पाहून मी थक्क होते. पण,मी त्याच्या मनातली बदल्याची भावना त्याचवेळी दूर करायला सांगितली आणि मित्रांला मारण्यापासून रोखलं. त्या रात्री माझं माझ्या मुलांसोबत बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. मी त्याला सांगितलं, की आयुष्यात अशी एकही व्यक्ती नाही जिच्यामध्ये एकही दोष नाही."

दरम्यान, झीनत अमान  यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे.  सत्यम शिवम् सुंदरम्, डॉन, हरे रामा हरे कृष्णा, कुर्बानी, दोस्ताना, लावारिस अशा कितीतरी गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

टॅग्स :झीनत अमानबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा