आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपट गत २१ डिसेंबरला रिलीज झाला. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण ‘झिरो’ने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. पहिल्या दिवशी चित्रपटाने २०.१४ कोटी कमावले. शाहरुख्नच्या चित्रपटाला २०.१४ कोटींची ओपनिंग हा आकडा तसा फार समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळे दुसºया दिवशी तरी या आकड्यात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण झाले वेगळेच, दुसºया दिवशी गल्ला वाढण्याऐवजी त्यात घट दिसली. दुसºया दिवशी चित्रपटाने केवळ १८.२२ कोटींची कमाई केली. म्हणजे, शुक्रवारच्या तुलनेत शनिवारच्या कमाईत ९.५३ टक्के घट दिसली.आज रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होणे अपेक्षित आहे. यानंतर नाताळच्या सुट्टीचाही चित्रपटाला फायदा होईल, असे मानले जात आहे. पण असे न झाल्यास येते दिवस या चित्रपटासाठी कठीण ठरू शकतात. कारण चित्रपट कुठलाही असो, रिलीजनंतरच्या ६ ते ७ दिवसांतच त्याचे पुढचे भविष्य ठरते. चित्रपट फ्लॉप आहे की हिट, याचा अंदाज येतो. त्यामुळे ‘झिरो’साठी येते दिवस कसोटी पाहणारे ठरणारे आहेत. त्यातच पुढच्या शुक्रवारी रणवीर सिंग व सारा अली खानचा ‘सिम्बा’ रिलीज होणार आहे. त्यामुळे ‘झिरो’ची वाटचाल आणखी कठीण होणार आहे. ‘सिम्बा’पुढे ‘झिरो’चा किती टिकाव लागतो, ते बघूच.‘झिरो’ चित्रपटात अनुष्का शर्मा, शाहरुख खान आणि कॅटरिना कैफ या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याधीही हे त्रिकूट ‘जब तक है जान’ चित्रपटात झळकले होते.
दुसऱ्या दिवशी घटली ‘झिरो’ची कमाई! कमावले इतके कोटी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 1:06 PM
आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपट गत २१ डिसेंबरला रिलीज झाला. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण ‘झिरो’ने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
ठळक मुद्देआज रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होणे अपेक्षित आहे. यानंतर नाताळच्या सुट्टीचाही चित्रपटाला फायदा होईल, असे मानले जात आहे. पण असे न झाल्यास येते दिवस या चित्रपटासाठी कठीण ठरू शकतात. कारण चित्रपट कुठलाही असो, रिलीजनंतरच्या ६ ते ७ दिवसांतच त्याचे पुढचे भविष