किंग खान शाहरूखच्या ‘झिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला आणि चाहते बेभान झालेत. होय, ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाल्या आणि सोशल मीडियावर व्ह्यूजचा जणू पाऊस पडला. रिलीजनंतरच्या अवघ्या २४ तासांत ५.४ कोटींवर लोकांनी ‘झिरो’चा ट्रेलर बघितला आणि याचसोबत देशात २४ तासांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ट्रेलरमध्येही याचा समावेश झाला आहे. तूर्तास हा ट्रेजर सोशल मीडियावर टॉप ट्रेण्डिंग बनला आहे.
झिरोने सोशल मीडियावर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’, ‘संजू’ आणि ‘बाहुबली २’ सारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे. ‘बाहुबली २’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज नंतरच्या २४ तासांत २.१८ कोटी लोकांनी पाहिला होता. रणबीर कपूर स्टरर ‘संजू’ १.९ कोटी तर आमिरच्या आगामी ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटातला पहिल्या २४ तासांत २.२ कोटी व्ह्युज मिळाले होते. या तुलनेत ‘झिरो’ला कितीतरी पुढे आहे. एकंदर काय तर ट्रेलर सुपरडुपर हिट आहे. चित्रपटही सुपरडुपर हिट हसणार, हे सांगणे नकोच.आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहेत. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे. शाहरूखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यादेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अनुष्का, कॅटरिना व शाहरूख यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात पाहायला मिळणार आहे. एकं हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.