Join us

जाळ अन् धूर संगटच...; MI अन् RCB च्या मॅचमध्ये वाजणार झापुक झुपूक गाणे; सूरज चव्हाणच्या व्हिडीओची चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 18:23 IST

'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातून सूरज चव्हाण हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं.

Suraj Chavan: 'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वातून सूरज चव्हाण हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं. बारामतीच्या साध्याभोळ्या सूरजने त्याच्या दमदार खेळीने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली. दरम्यान, गुलिगत किंग सूरज चव्हाण आता लवकरच नव्याकोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सूरज चव्हाणच्या (Suraj Chavan ) 'झापुक झुपूक' चित्रपटाची (Zapuk Zupuk) सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने गुलिगत किंग सूरज चव्हाण आज होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि 'रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर' संघाच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडिअमवर पोहोचला आहे. याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे. 

कृणाल घोरपडे ऊर्फ क्रेटेक्स 'झापुक झुपूक'चं गाणे आज होणाऱ्या या मॅचमध्ये वाजवलं जाणार आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याबद्दल व्हिडीओ पोस्ट शेअर सूरजने माहिती दिली आहे. त्यामध्ये तो म्हणाला, "आज मुंबई इंडियन्स विरुद्ध 'रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर' च्या सामन्यामध्ये आपलं ‘झापुक झुपूक’ गाणं वाजणार आणि ह्यो तुमचा टॉपचा किंग सगळीकडे गाजणार!" त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते देखील प्रचंड खुश झाले आहेत. 

केदार शिंदे दिग्दर्शित झापुक झुपूक सिनेमा येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सूरज सोबत मिलिंद गवळी, दीपाली पानसरे, जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव आणि पुष्कराज चिरपुटकर हे कालकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

टॅग्स :केदार शिंदेमराठी चित्रपटइंडियन प्रिमियर लीग २०२५