जंक फूड खाण्याच्या सवयीपासून 'या' ५ टिप्सच्या मदतीने मिळवा सुटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:51 AM2018-08-13T11:51:01+5:302018-08-13T11:51:32+5:30

जंक फूड हे खाण्यासाठी भलेही चवदार लागत असेल पण त्याचे अनेक तोटेही आहेत. यामुळे वजन वाढण्यासारखी गंभीर समस्याही अधिक होऊ लागली आहे.

5 tips break a junk food addiction | जंक फूड खाण्याच्या सवयीपासून 'या' ५ टिप्सच्या मदतीने मिळवा सुटका!

जंक फूड खाण्याच्या सवयीपासून 'या' ५ टिप्सच्या मदतीने मिळवा सुटका!

Next

अलिकडे बदलत्या लाइफस्टाइलमध्ये खाण्या-पिण्याच्याही अनेक सवयी बदलल्या आहेत. पिझ्झा, बर्गर, मॅगी किंवा आणखीही काही जंक फूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. काही लोक हे केवळ वेगळं ट्राय करायचं म्हणून खातात पण काहींना जंक फूडची सवय लागली आहे. जंक फूड हे खाण्यासाठी भलेही चवदार लागत असेल पण त्याचे अनेक तोटेही आहेत. यामुळे वजन वाढण्यासारखी गंभीर समस्याही अधिक होऊ लागली आहे. ही सवय मोडण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात पण उपयोग होताना दिसत नाही. अशात जंक फूड खाण्याची ही सवय मोडण्यासाठी काही टिप्स आम्ही सांगत आहोत...

१) कॉफी

जर तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने भूक लागत असेल तर तुम्ही दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. जर तुम्हाला जंक फूड खाण्याची खूप इच्छा होत असेल तर ती इच्छा घालवण्यासाठी तुम्ही कॉफी घेऊ शकता. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे भूक शांत होते. कॉफी प्यायल्यानंतर पोट भरलेलं राहतं आणि भूकही शांत होते. 

२) अंडी किंवा पनीर खा

अंडी आणि पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. तुम्ही जितकं प्रोटीनचं सेवन करा तितकी तुम्हाला कमी भूक लागेल आणि पोटही भरलेलं राहील. दोन्ही पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असतं.

३) थोडं थोडं खात रहा

जर तुम्हाला पुन्हा पुन्हा जंक फूड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही दिवसभर थोडं थोडं काहीतर खायला हवं. याने तुम्ही ओव्हर इंटिगपासून दूर रहाल. जंक फूड हे खायला जरी चांगले लागत असले तरी काही वेळाने याने पोट जड होतं.

४) डार्क चॉकलेटचं करा सेवन

काही रिसर्चनुसार, डार्क चॉकलेट वजन कमी करण्यासाठी फायद्याची असते. हे चॉकलेट हाय इम्यूनिटी बूस्टर असतं आणि यात कॅलरीज सुद्धा कमी असतात. त्यामुळे जर तुम्हाला फास्ट फूड खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा लगेच डार्क चॉकलेट खावं. याने तुमची जंक फूड खाण्याची इच्छा शांत होईल. सोबतच वजन कमी होईल.

५) मेडिटेशन करा

(Image Credit : spiritualityhealth.com)

वरील वेगवेगळ्या उपायांपेक्षाही महत्वाचं आहे डोकं शांत ठेवा. एका रिसर्चनुसार, काही लोकांना स्ट्रेस जास्त असेल तर त्यांना भूक जास्त लागते. त्यामुळे दिवसातून किमान १० ते १५ मिनिटे मे़डिटेशन करा. याने तुमचा स्ट्रेस कमी होईल.
 

Web Title: 5 tips break a junk food addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.