Orange Benefits : हिवाळ्यात बाजारात वेगवेगळी फळं अधिक मिळतात. यातील एक महत्वाचं फळ म्हणजे संत्री. या दिवसात संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे शरीराच्या इम्युनिटीसाठी फार गरजेचं असतं. थंडीच्या दिवसात इम्युनिटी वीक झाल्याने सतत सर्दी-खोकला होत राहतो. संत्री इम्यून सिस्टीम मजबूत करतं आणि आजारांपासून बचाव करतं.
हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेकांना असं वाटतं की, संत्री खाल्ल्याने खोकला होईल. पण तसं नाहीये. त्याचे अनेक फायदे होतात. संत्र्यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरून राहतं. ज्यामुळे जास्त खाणं टाळलं जातं. त्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. तसेच यामुळेच कॅलरीचं प्रमाणही कमी होतं.
संत्री खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोकाही कमी होतो. लघवीमध्ये सायट्रेटचं प्रमाण कमी असल्याने किडनी स्टोन होऊ शकतो. सायट्रेट एक सायट्रिक अॅसिड असतं जे सामान्यपणे संत्रीसारख्या आंबट फळांमध्ये आढळून येतं. किडनी स्टोन झालेल्या लोकांना सामान्यपणे संत्र्याचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो. याने लघवीतील सायट्रिक अॅसिडचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका कमी होतो.
आंबट फळं खाऊन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. असं मानलं जातं की, संत्र्यामध्ये असलेलं फ्लेवोनोइड्स हृदयरोग वाढण्याचा धोका कमी करतं. यासोबतच याने ब्लड सेल्सचं फंक्शनही अधिक चांगलं होतं.
संत्री केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर असतं. याने त्वचा तजेलदार राहते. याने त्वचेवरील दाग, पिंपल्स दूर होतात.
कोणत्या वेळी खावेत?
तशी तर संत्री तुम्ही कोणत्याही वेळी खाऊ शकता. पण तुम्हाला याचा जास्त फायदा मिळवायचा असेल तर काही खास वेळांवर खावेत.
सकाळी
सकाळी नाश्त्यात संत्री खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात मिळतात. सोबतच तुम्हाला फ्रेश वाटतं आणि दिवसभर ऊर्जा मिळते.
जेवणानंतर
जेवणानंतर संत्री खाल्ल्याने पचनक्रिय चांगली होण्यास मदत मिळते. पोट हलकं होतं. संत्र्याच्या रसात असे तत्व असतात ज्याने अॅसिडिटी कमी होते.
वर्कआउटनंतर
जर तुम्ही एक्सरसाईज करत असाल तर संत्री खाल्ल्याने शरीराल आवश्यक पोषण आणि एनर्जी मिळेल. याने मांसपेशी रिकव्हर होतात आणि शरीर हायड्रेटेड राहतं.