Cabbage Worm: हिवाळा सुरू होताच बाजारात अनेक प्रकारच्या भाज्या मिळू लागतात. यातील एक म्हणजे पत्ता कोबी. भरपूर लोक आवडीने ही भाजी खातात आणि ही भाजी आरोग्यासाठीही फायदेशीर असते. एक्सपर्ट सुद्धा ही भाजी नियमितपणे खाण्याचा सल्ला देतात. मात्र, पत्ता कोबी शिजवतात आणि खाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. असं केलं नाही तर मोठी समस्या होऊ शकते.
पत्ता कोबीतील अळ्यांपासून वाचा
पत्ता कोबीमध्ये अनेकदा अळ्या आढळून येतात. या अळ्या तुमच्या आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतात. या तुमच्या मेंदुत जाऊन तुमचा जीव धोक्यात टाकू शकतात. अशात डॉक्टरांनी काही टिप्स सांगितल्या आहेत.
न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रियंका सहरावत (Dr.Priyanka Sehrawat) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी सांगितलं की, "पत्ता कोबी खाल्ल्याने यातील अळ्यांमुळे मेंदुची समस्या होऊ शकते. या समस्येला न्यूरोसिस्टीसरकोसिस (Neurocysticercosis) असं म्हणतात. यात असं नसतं की, मेंदुत एखादी अळी फिरत असते. हे कीटकाचे अंडे असतात, ज्यांना टीनिया सोलिअम म्हणतात.
"या अळ्यांची अंडी मातीमध्ये असतात. मातीत उगवणारे फळं आआणि भाज्यांमध्ये ते चिकटतात. जर तुम्ही भाज्या व्यवस्थित धुतल्या नाही तर ही अंडी तुमच्या आतड्यांमध्ये आणि नंतर इंटेस्टाइनच्या माध्यमातून रक्तात आणि नंतर मेंदुत जातात. जेव्हा हे मेंदुत जातात तेव्हा मेंदुतील टिश्यू त्यांच्या विरोधात लगेच रिअॅक्शन करतो. जेणेकरून त्यांना तिथेच रोखता यावं. ज्यामुळे मेंदुवर सूज येते, जी एमआरआयमध्ये दिसते".
"मेंदुवर सूज आल्याने झटके येतात. मेंदुतील अळी आपल्या देशात झटके येण्याचं सगळ्यात कॉमन कारण आहे. खासकरून लहान मुलांमध्ये. यापासून बचावासाठी जेव्हाही फळं आणि भाज्या खाल तेव्हा चांगल्या धुवून खाव्यात".