वजन कमी करण्यासाठी 'या' गोष्टींचा आहारात समावेश करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 04:08 PM2018-08-01T16:08:02+5:302018-08-01T16:08:15+5:30
जास्तीत जास्त वेळ बैठं काम केल्यामुळे लोकांना पोट वाढण्याच्या समस्येचा किंवा वजन वाढण्याच्या समस्येचा त्रास होऊ लागतो. काही लोकं तर दररोज जिम करण्यासोबतच प्रॉपर एक्सरसाइजही करतात पण तरिही त्यांचं वजन कमी होत नाही.
जास्तीत जास्त वेळ बैठं काम केल्यामुळे लोकांना पोट वाढण्याच्या समस्येचा किंवा वजन वाढण्याच्या समस्येचा त्रास होऊ लागतो. काही लोकं तर दररोज जिम करण्यासोबतच प्रॉपर एक्सरसाइजही करतात पण तरिही त्यांचं वजन कमी होत नाही. याचं कारण म्हणजे तुमचा आहार. तुमच्या आहारात समाविष्ट असणाऱ्या पदार्थांमुळे तुम्हाला वजन वाढीच्या समस्या सतावतात. आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा बनून उभ्या आहेत. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर चुकूनही या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करू नका.
1. बटाटा आणि मटण
सर्वसामान्य लोकांच्या आहारामध्ये बटाट्याचा समावेश होतो. स्वयंपाक घरांमध्येही बटाटा सहज आढळून येतो. परंतु बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. त्यामुळे बटाटा खाल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारात बटाट्याचा समावेश करू नये. याव्यतिरिक्त मटण, अंड, खेकडे, प्रॉन्स यांसारख्या पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे या पदार्थांचेही सेवन करणे टाळावे.
2. मैदा
आपण बऱ्याचदा भूक भागवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जंक फूडचा आधार घेतो. त्यामध्ये मैदाचं प्रमाण अधिक असतं. त्याचप्रमाणे पिझ्झा, बर्गर आणि पॅटीस तसेच मॅगी यांसारख्या गोष्टींमध्ये मैद्याचं प्रमाण अधिक असतं. मैद्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्यामुळे मधुमेह आणि कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका संभवतो.
3. मद्यपान
सतत मद्य सेवन केल्याने अन्ननलिका आणि गळ्यामध्ये जळजळ होते. त्यामुळे शरीरामध्ये सूज आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. तसेच दारूमुळे लिव्हरला सूज येते. त्यामुळे दारू पिणं शक्यतो टाळावं.
4. सोडा किंवा कोल्ड्रिंक्स
कोल्ड्रिंक्समध्ये सर्वात जास्त साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे जास्त कोल्ड्रिंक्स आरोग्यासाठी हानिकारक असून लठ्ठपणा होतो. कोल्ड्रिंक्समध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असून त्याच्या जास्त सेवनाने मधुमेह होण्याचा धोका संभवतो.
5. तांदूळ
भारतामध्ये मुख्यतः तांदळाचा वापर फार करण्यात येतो. परंतु तांदळामध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असल्यामुळे वजन वाढते. त्यासाठी तांदूळ उकडल्यानंतर त्यातील पाणी काढून घ्या आणि मगच खा.