फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त फायदेशीर असतात फेकल्या जाणाऱ्या 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 12:03 PM2018-08-06T12:03:36+5:302018-08-06T12:05:07+5:30

आपण अनेकदा जेवण तयार करताना अनेक आरोग्यदायी पदार्थांकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा अनेक पदार्थ आपण टाकूनही देतो. त्यामध्ये फळं किंवा भाज्यांची साल आणि अंड्याची कवचं यांचा समावेश असतो.

Foods that look as a Waste but are Healthy and too Useful | फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त फायदेशीर असतात फेकल्या जाणाऱ्या 'या' गोष्टी!

फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त फायदेशीर असतात फेकल्या जाणाऱ्या 'या' गोष्टी!

Next

(Image creadit : The Conversation)

आपण अनेकदा जेवण तयार करताना अनेक आरोग्यदायी पदार्थांकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा अनेक पदार्थ आपण टाकूनही देतो. त्यामध्ये फळं किंवा भाज्यांची साल आणि अंड्याची कवचं यांचा समावेश असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ज्या गोष्टी तुम्ही कचरा समजून टाकून देता त्याच गोष्टी शरीरासाठी फायदेशीर असतात. एवढचं नव्हे तर त्यातील मूळ पदार्थांपेक्षाही त्या अधिक फायदेशीर असतात. जाणून घेऊयात अशा काही गोष्टींबाबत ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो पण त्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. 

1. नासलेलं दूध

अनेकदा आपण नासलेलं दूध खराब समजून टाकून देतो. पण हे शरीरासाठी फायदेशीर असून त्यापासून अनेक चविष्ट खाद्यपदार्थ तयार करता येतात. यापासून तुम्ही पनीर तयार करू शकता. त्याचप्रमाणे क्रिमही तयार करू शकता.

2. गाजराची पानं

शरीरासाठी गाजर जितकं फायदेशीर आहे, तितकीच फायदेशीर गाजराची पानं असतात. संशोधनानुसार, गाजराच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्व असतात. तुम्ही या पानांचा वापर सलाड, सूप आणि स्मूदी तयार करण्यासाठी करू शकता. 

3. केळीची साल

बऱ्याचदा आपण केळी खातो आणि त्यांची साल कचऱ्यामध्ये टाकून देतो. पण केळ्यापेक्षा त्याच्या सालींमध्ये शरीरासाठी अनेक फायदेशीर घटक आढळून येतात. केळ्याची साल त्वचेसाठी फायदेशीर असते. केळ्याच्या सालीने चेहऱ्यावर मसाज केल्याने त्वचा तजेलदार होते आणि मुरमांच्या समस्या दूर होतात. सालीचा वापर तुम्ही खाण्यासाठीही करू शकता. यापासून तुम्ही चहा आणि जॅम तयार करू शकता.

4. सफरचंदाची साल

जर तुम्हाला तुमच्या चहाची चव वाढवायची असेल, तर त्यामध्ये सफरचंदाची साल घालणं फायदेशीर ठरतं. यामुळे तुम्हाला चहामध्ये वेगळा फ्लेवर मिळेल. याव्यतिरिक्त तुम्ही जॅम, ज्यूस आणि वाइन तयार करण्यासाठीही या सालींचा वापर करू शकता.

5. कांदा आणि लसणाच्या साली

कांदा आणि लसणाच्या सालींमध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडेंट असता. जे आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. या सालींचा वापर करण्यासाठी ते पाण्यामध्ये उकळून घ्या आणि हे पाणी जेवण तयार करताना वापरा. 

6. अंड्याची कवचं

अंड्याच्या कवचांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असतं. एका संशोधनानुसार, तुम्ही या कवचांची बारीक पूड करून ती दूधामध्ये घालून घेऊ शकता. 

Web Title: Foods that look as a Waste but are Healthy and too Useful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.