इच्छा असूनही पाणीपुरी खाणं टाळत असाल तर 'हे' नक्की वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 12:22 PM2018-08-03T12:22:55+5:302018-08-03T12:24:51+5:30
पाणीपूरी म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. असं क्वचितचं कुणी असेल ज्याला पाणीपूरी अजिबात आवडत नाही. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा ठेला दिसला तर तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा तर आपसूकच आपली पावलं त्या ठेल्याकडे वळतात.
पाणीपूरी म्हणजे सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. असं क्वचितचं कुणी असेल ज्याला पाणीपूरी अजिबात आवडत नाही. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा ठेला दिसला तर तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा तर आपसूकच आपली पावलं त्या ठेल्याकडे वळतात. पण गेल्या अनेक दिवसांपासून याच पाणीपुरीविरोधात मोहिम राबवण्यात येत आहे. वडोदरामध्ये पावसाळ्यात पाणीपूरी बॅन केली असून गुजरातमध्येही बॅन करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधीही पाणीपुरीच्या ठेलेवाल्यांचे अनेक आक्षेपार्ह्य व्हिडीओ समोर आले होते. तेव्हापासून लोकांच्या मनात पाणीपुरीबाबत व्दिधा मनस्थिती पाहायला मिळते. पण हा पदार्थ तुम्ही घरी तयार करूनही खाऊ सकता. आज आपण जाणून घेऊयात पाणीपुरीचे आरोग्यवर्धक फायदे...
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर पाणीपुरी हा उत्तम पर्याय आहे. फक्त रव्याच्या पुऱ्या न खाता कोणत्याही पीठाच्या पुऱ्यांचा वापर करा. तसेच जलजीरा आणि मीठ असलेल्या पाण्याशिवाय पुदीना, लिंबू, हिंग आणि कैरी घालून तयार कलेलं पाणी वापरा त्यामुळे तुमचं वाढतं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
माऊथ अल्सरपासून सुटका
पाणीपुरीचं पाणी तयार करताना त्यामध्ये जलजीरा आणि पूदीन्यासारख्या गोष्टी वापरल्या जातात. जलजीऱ्यातील तिखट आणि पूदीन्यातील आंबट गुणधर्म माऊथ अल्सर दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
अॅसिडिटी दूर करण्यासाठी
पाणीपुरी तयार केली असेल तर त्यावेळी रव्याच्या पुऱ्यांचा वापर न करता कोणत्याही पीठाच्या पूऱ्यांचा वापर करावा. त्याचबरोबर पाणीपुरीसाठी पाणी तयार करताना जलजीऱ्यासोबतच पुदीना, कैरी, काळं मीठ. काळीमीरी, जीऱ्याची पूड आणि साध मीठं घालून पाणी तयार करावं. या सर्व पदार्थांमुळे अॅसिडिटी काही वेळातच दूर होण्यास मदत होईल.
मूड रिफ्रेश होतो
रोजच्या धावपळीतून शरीर थकून जातं. त्याचसोबत आपला मूडही खराब होतो. तसेच बऱ्याचदा बाहेर फिरताना गरम होतं. अशावेळी मूड रिफ्रेश करण्यासाठी काहीतरी थंड पिण्याची अथवा खाण्याची इच्छा होते. अशावेळी पाणीपुरी हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. पाणीपुरीचं पाणी तयार करताना त्यामध्ये जलजीरा, सैंधव मीठ आणि पुदीन्याचा वापर करतात. यांमुळे मुड रिफ्रेश होण्यास मदत होते.