मध आणि हळद एकत्र खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज कराल सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 11:24 AM2024-11-16T11:24:26+5:302024-11-16T11:25:10+5:30

Honey with Haldi Health Benefits: हळद आणि तुपात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण आढळतात. जे वातावरण बदलात होणाऱ्या इन्फेक्शन आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून बचाव करतात.

Honey with turmeric can prevent you many disease | मध आणि हळद एकत्र खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज कराल सेवन!

मध आणि हळद एकत्र खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज कराल सेवन!

Honey with turmeric Health Benefits: भारतीय किचनमध्ये आढळणारे फूड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. आज आम्ही तुम्हाला दोन अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत. मध आणि हळद. हळद आणि तुपात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण आढळतात. जे वातावरण बदलात होणाऱ्या इन्फेक्शन आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शनपासून बचाव करतात. अशात मध आणि हळद मिक्स करून सेवन केल्यास काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

इम्यूनिटी वाढते

गरम पाण्यात हळद आणि मध टाकून सेवन केल्यास इम्यूनिटी बूस्ट होण्यास मदत मिळते. अधिक फायद्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी याचं सेवन करावं.

वजन कमी होईल

सकाळी गरम पाण्यात हळद आणि मध मिक्स करून सेवन केल्यावर मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रोसेसही वेगाने होते.

सर्दी-खोकला

सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी हळद आणि मधाचं सेवन करू शकता. याने घशालाही आराम मिळतो.

त्वचेसाठी फायदेशीर

गरम पाण्यात हळद आणि मध टाकून सेवन केल्यावर त्वचा आतून क्लीन होण्यास मदत मिळते. यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होते.

Web Title: Honey with turmeric can prevent you many disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.