(Image Creadit : freepressjournal.in)
आपल्याला अनेकदा भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सतत इच्छा होत असते. एकदा खाल्लं तर सारखं खातचं राहतो. त्याला ओव्हरइटिंग म्हणतात. आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा अधिक खाल्ल तर वजन वाढतं. त्याचप्रमाणे शरीराशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात. जर तुम्हीही गरजेपेक्षा जास्त खात असाल तर लगेच तुमची ही सवय बदला. नाहीतर अनेक आजार आणि समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जाणून घेऊयात गरजेपेक्षा जास्त खाल्यानं शरीराला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याबाबत...
1. लठ्ठपणा
गरजेपेक्षा जास्त खाल्यानं वजन वाढण्यास सुरुवात होते. वाढलेल्या वजनामुळे शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमी होते.
2. अॅलर्जी
जास्त प्रमाणात खाल्यानं अॅलर्जीही होऊ शकते. अंड, दूध, मासे, धान्य यांपासून तयार करण्यात आलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्यानं अॅलर्जी वाढतं.
3. कोलेस्ट्रॉल वाढतं
आपण खात असलेल्या अनेक पदार्थांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा अधिक असते. असे पदार्थ जास्त खाल्यानं रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. त्यामुळे हृहयाशी निगडीत अनेक आजार होण्याची शक्यता असते.
4. पिम्पल्स
जास्त खाल्यानं पिम्पल्सची समस्याही उद्भवते. जास्त फॅट्स असलेले पदार्थ खाल्यानं पिम्पलसची समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त गायीचं दूध जास्त प्यायल्यानेही हा प्रॉब्लेम उद्भवतो.
5. अॅसिडिटी
ज्याप्रमाणे काही न खाल्यामुळे जशी अॅसिडिटी होते, त्याचप्रमाणे गरजेपेक्षा जास्त खाल्यानेही अॅसिडिटी होते. अॅसिडिटी जास्तकरून संत्री, टॉमेटो, चॉकलेट यांसारख्या गोष्टींचं जास्त सेवन केल्यामुळे होते.
6. किडनी प्रॉब्लेम
जास्त प्रोटीन असणारे खाद्यपदार्थ खाल्याने किडनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे किडनी स्टोनचा त्रासही होऊ शकतो. यापासून वाचण्यासाठी आहारामध्ये पालकचा समावेश करणं फायदेशीर ठरतं.
7. विसरण्याची समस्या
सारखं सारखं फॅट्स आणि कॉपर असलेल्या पदार्थांचं सेवन केल्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ जास्त खाणं टाळणं गरजेचं आहे.
8. सूज येणं
गरजेपेक्षा जास्त मीठ असलेले आणि गोड पदार्थ खाल्यानं शरीराला सूज येते. त्यामुळे असे पदार्थ खाणं शक्य तेवढं टाळावं.