उपवासाचा थकवा आला असेल तर हेल्दी खजूर मिल्कशेक नक्की ट्राय करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 09:05 AM2018-10-13T09:05:05+5:302018-10-13T09:05:05+5:30
नऊ दिवसाचे उपवास केल्यावर अनेकदा थकवा येत असतो. अशावेळी हेल्दी खजूर मिल्कशेक तुम्हाला नवी ऊर्जा देईल यात शंका नाही.
पुणे : नऊ दिवसाचे उपवास केल्यावर अनेकदा थकवा येत असतो. अशावेळी हेल्दी खजूर मिल्कशेक तुम्हाला नवी ऊर्जा देईल यात शंका नाही.
साहित्य :
आठ ते दहा खजूर
दीड ग्लास दूध
चार ते पाच बदाम
बर्फाच्या क्यूब
साखर दोन लहान चमचे किंवा मध (आवश्यकतेनुसार)
कृती :
मिक्सरच्या भांड्यात बिया काढून आठ ते दहा खजूर , बर्फाच्या क्यूब, चार ते पाच बदाम एकत्र करून फिरवा.
मोठ्या भांड्यात दूध घेऊन त्यात मिक्सरमध्ये फिरवलेले मिश्रण एकजीव करून घ्या.
खजुरामुळे गोडवा येतोच मात्र आवश्यक असल्यास मध किंवा साखर घालून मिल्कशेक हलवा.
थंड मिल्कशेक खजुराचे तुकडे, बदामाचे तुकडे घालून, सजवून सर्व्ह करा.
या कृतीतून दोन ग्लास मिल्कशेक तयार होतो .