आपल्यापैकी जवळपस सर्वचजण कॉफी पितात. याबाबत आपल्याला अनेकजण सल्ले देत असतात. कॉफी गरजेपेक्षा जास्त पिणं ठिक नाही. त्यामध्ये कॅफेन असतं. अशा अनेक गोष्टी येणारं जाणारं प्रत्येकजण आपल्याला सांगत असतं. परंतु तुम्हाला माहीत आहे का? ज्या व्यक्ती जास्त कॉफी पितात. त्यांच्यासाठी एक खास कॉफी आहे. आता तुम्ही म्हणाल एक कॉफी सोडून दुसरी कॉफी पिण्यात काय अर्थ... तर ही कॉफी तुम्ही जी दररोज पिता त्या कॉफीपेक्षा फार वेगळी आहे. तसेच यामध्ये कॉफीमधील सर्वात हानिकारक तत्व आणि कॅफेन कमी प्रमाणात असते. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, डिकॅफिनेट कॉफीबाबत... आता तुम्ही म्हणाल अशी कोणती कॉफी आहे?
खरं तर जर तुम्ही दररोज कॉफी पित असाल तर एक ते दोन कप कॉफी पिणं फायदेशीर ठरतं. परंतु यापेक्षा जास्त कॉफी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जर तुम्ही कॉफी प्रेमी असाल आणि भरपूर कॉफी पिण्याची सवय असेल, तर तुम्ही डिकॅफिनेट कॉफी ट्राय करू शकता. या कॉफीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
जास्त कॉफी प्यायल्याने शरीरामध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त होतं. यामुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु डिकॅफिनेट कॉफीमुळे यांसारख्या समस्या उद्भवत नाहीत. उलट शरीराला अनेक फायदे होतात. त्याचबरोबर ही कॉफी चवीसाठीही उत्तम असते.
डिकॅफिनेट कॉफी सामान्य कॉफीपेक्षा थोडी महाग असते, परंतु यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. सामान्य कॉफीच्या तुलनेमध्ये डिकॅफिनेट कॉफीमध्ये 91 टक्के कॅफेन कम असतं.
रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करते
डिकॅफिनेट कॉफीमध्ये कॅफेन कमी असतं. परंतु अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म जास्त असतात. त्यामुळे ही कॉफी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. त्यामुळे ही कॉफी तुम्ही हवी तेवढी पिऊ शकता.
डिकॅफिनेट कॉफी तयार करताना त्यावर डिकॅफिनेट प्रक्रिया करण्यात येते. या कॉफीमुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाणही वाढते. त्यामुळे टाइप-2 डायबिटीसने ग्रस्त असणाऱ्या लोकांसाठी ही कॉफी फायदेशीर ठरते.
डिकॅफिनेट कॉफीचे साइड इफेक्ट्स नाहीत...
डिकॅफिनेट कॉफी प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या होत नाही. त्यामुळे ही कॉफी अॅसिडीटीची समस्या असणाऱ्या लोकांसाठीही उत्तम ठरते. ज्या लोकांना मायग्रेन किंवा हार्टबर्नच्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठीही डिकॅफिनेट कॉफी फायदेशीर ठरते. याशिवाय यामध्ये कॅफेन अगदी कमी असल्यामुळे कॉफीचे साइड इफेक्ट्स म्हणजेच, झोप न येणं, चिडचिड होणं, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्या दिसून येत नाहीत.
अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, डिकॅफिनेट कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये अल्झायमर आणि पार्किंसंस यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्हीही तुमच्या कॅफेनयुक्त कॉफीऐवजी डिकॅफिनेट कॉफीचा आहारात समावेश करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.