Moringa Leaves Kadha : शेवग्याची पाने, फुलं आणि पानांचा वापर फार पूर्वीपासून औषधी म्हणून केला जातो. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि अमीनो अॅसिड असतं. या पानांचं नियमित सेवन केल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात हिवाळ्यात शेवग्याच्या पानांचा काढा पिण्याचे फायदे आणि तो तयार करण्याची पद्धत आम्ही सांगणार आहोत.
हाडे होतील मजबूत
शेवग्याच्या पानांचा काढा प्यायल्याने तुमच्या हाडांना पोषण मिळतं. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. यातील कॅल्शिअमने बोन डेंसिटी वाढते, तर फॉस्फोरसने हाडांचं आरोग्य चांगलं राहतं. या काढ्याचं नियमितपणे सेवन केल्याने हाडांसंबंधी समस्या ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.
ब्लड प्रेशर कंट्रोल
शेवग्याच्या पानांचं नियमितपणे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. याने तुमच्या ब्लड वेलल्स हेल्दी राहतात, ज्यामुळे ब्लड सर्कुलेशन सुरळीत होतं. सोबतच कोलेस्ट्रॉल कंट्रोल करून हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल तर या पानांचा काढा नियमित सेवन करा.
बद्धकोष्ठता होईल दूर
शेवग्याच्या पानांचा काढा पोटासंबंधीही अनेक समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन अशा समस्या दूर करण्यात हा काढा मदत करतो. या काढ्याने पोटही चांगलं साफ होतं. यातील अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पोटातील सूज आणि जळजळ कमी करतात. ज्यामुळे गॅस आणि पचन होत नाही.
वजन कमी करतो
या पानांच्या काढ्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रियाही वेगाने होते. अशात तुम्हाला वेगाने वजन कमी करण्यास मदत मिळते. त्याशिवाय या पानांमध्ये फायबर भरपूर असतं, ज्याने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात तुम्ही ओव्हरईटींगपासून वाचता.
रक्त शुद्ध होतं
शेवग्याच्या पानांचा काढा प्यायल्याने शरीरातील रक्त शुद्ध होतं. यातील तत्वांमुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. अशात वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होतो आणि रक्त शुद्ध झाल्याने त्वचेसंबंधी समस्याही होत नाही.
कसा तयार कराल हा काढा?
शेवग्याच्या पानांचा काढा बनवण्यासाठी सगळ्यात आधी काही पाने चांगली धुवून घ्या. दोन कप पाणी एका भांड्यात टाकून पाने चांगली उकडू द्या. पाणी अर्ध शिल्लक राहिल्यावर गॅस बंद करा. आता यात थोडं काळी मिरी पावडर आणि काळं मीठ टाकून मिक्स करा. कोमट किंवा थंड झाल्यावर याचं सेवन करा.