तांदळाच्या पाण्याचं सेवन करुन लगेच मिळवा एनर्जी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:27 AM2018-10-15T10:27:14+5:302018-10-15T10:28:31+5:30

भात सर्व लोक खातात, पण काही लोक तांदूळ उकळून भात तयार करतात आणि त्यांच शिल्लक राहिलेलं पाणी फेकून देतात.

Needs instant energy then drink rice water | तांदळाच्या पाण्याचं सेवन करुन लगेच मिळवा एनर्जी!

तांदळाच्या पाण्याचं सेवन करुन लगेच मिळवा एनर्जी!

Next

(Image Credit : YouTube)

भात सर्व लोक खातात, पण काही लोक तांदूळ उकळून भात तयार करतात आणि त्यांच शिल्लक राहिलेलं पाणी फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, तांदूळ शिजवल्यावर त्यातून निघालेलं पाणी हे अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज देतं. याचा फायदा केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमचं सौंदर्य खुलवण्यातही आहे. 

लगेच मिळेल एनर्जी

हे पाणी तुमच्या शरीराला भरपूर एनर्जी देऊ शकतं कारण यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट असतात. सकाळी हे पाणी प्यायल्याने जास्त फायदा होतो. गरम तांदळाच्या पाण्यात तूप आणि मिठ टाकून सेवन करु शकता.

पोटाची समस्या दूर होईल

तांदळाच्या या पाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि याने तुमचं मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. यासोबतच याने तुमची पचनक्रियाही अधिक मजबूत होते. तसेच चांगले जीवाणू सक्रीय करण्यासही याने मदत मिळते. याने पोटाची समस्या दूर होऊ शकते. 

डायरियापासून बचाव

लहान मुले असो वा मोठे दोघांसाठीही डायरियाची समस्या दूर करण्यासाठी तांदळाचं पाणी फायदेशीर आहे. आजाराची लक्षणे दिसल्या दिसल्या तांदळाच्या पाण्याचं सेवन करा, याने तुम्हाला आराम मिळेल.

ताप आला असेल तर

वायरल इन्फेक्शनचा ताप आला असेल आणि अशात तांदळाचं पाणी सेवन केल्यास शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही. सोबतच तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्व सुद्धा मिळतात. याने तुम्हाला लगेच आराम मिळेल. 

हाय ब्लड प्रेशर करा कंट्रोल

तांदळाचं पाणी हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठीही फायदेशीर आहे. तांदळामध्ये सोडियम कमी असल्या कारणामे ब्लड प्रेशर आणि हायपरटेंशनने ग्रस्त लोकांना याचा फायदा होतो. 

डिहायड्रेशनपासून बचाव

शरीरात पाणी कमी झालं की, डिहायड्रेशनची समस्या होते. खासकरुन गरमीच्या दिवसात ही समस्या अधिक होते. तांदळांचं पाणी तुमच्या शरीरातील पाणी कमी होऊ देत नाही. 

त्वचा करा चमकदार

त्वचेची चमक वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. तांदळाच्या पाण्याने तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कॉटनच्या मदतीने तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावावं लागेल. 

Web Title: Needs instant energy then drink rice water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.