नाश्ता करताना पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा असा गृहिणीचा कायम प्रयत्न असतो. त्यातही नाश्ता बनंवायला सोपा आणि चवीला चांगला असावा असाही निकष असतो. असेच कर्नाटक मधले प्रसिद्ध मुष्टी डोसे. तेव्हा हे चवदार आणि आरोग्यदायी डोसे नक्की करून बघा.
साहित्य :
1 वाटी तांदूळ
2 चमचे उडीद डाळ,
1/4 चमचा मेथीदाणे
अर्धी वाटी पोहे
अर्धी वाटी खोवलेले खोबरे
मीठ
तेल
कृती :
- 1 वाटी तांदूळ, 2 चमचे उडीद डाळ, 1/4 चमचा मेथीदाणे चार तास भिजत ठेवावे.
- चार तासानंतर हे मिश्रण मिक्सरवर बारीक वाटावे,आता त्यात अर्धी वाटी खवलेले ओले खोबरे आणि अर्धी वाटी भिजवलेले जाड पोहे घालावे आणि थोडे पाणी घालून डोसा बॅटरसारखे तयार करतबारीक वाटावे.
- सर्व मिश्रण एका डब्यात ठेवून डावाने 3/4 मिनिटे घोटावे आणि 8 तास आंबण्यास ठेवावे.
- 8 तासानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घालून डावाने पॅनवर मिश्रण घालून डोसे करावे.
- डोसे करताना लोणी घातले तर चव वाढते मात्र हे आवडीनुसार आहे .
- मिश्रण पॅनवर फार पसवरू नये. त्यावर 2 मिनिटे झाकण ठेवावे, छान जाळी पडते.
- कोणत्याही चटणीबरोबर छान लागतो. हा डोसा दावनगिरी डोशाप्रमाणेच दिसतो मात्र चवीला वेगळा आहे.