World Chocolate Day : 'ही' आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 01:10 PM2018-07-07T13:10:13+5:302018-07-07T13:13:52+5:30

कुछ मीठा हो जाये म्हणत कोणतेही चांगले काम सुरू करण्याआधी तोंड गोड करण्याची पद्धत आहे. संपूर्ण जगभरात चॉकलेट हे काम पार पाडते. चॉकलेटला संपूर्ण जगभरातून पसंती मिळते. डेझर्ट म्हणून चॉकलेट खाल्ले जाते.

world chocolate day 2018 worlds most precious and expensive chocolates | World Chocolate Day : 'ही' आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स!

World Chocolate Day : 'ही' आहेत जगातील सर्वात महागडी चॉकलेट्स!

googlenewsNext

कुछ मीठा हो जाये म्हणत कोणतेही चांगले काम सुरू करण्याआधी तोंड गोड करण्याची पद्धत आहे. संपूर्ण जगभरात चॉकलेट हे काम पार पाडते. चॉकलेटला संपूर्ण जगभरातून पसंती मिळते. डेझर्ट म्हणून चॉकलेट खाल्ले जाते. त्याचबरोबर चॉकलेटचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. चॉकलेट वेगवेगळ्या शेपमध्ये उपलब्ध असते. तसेच चॉकलेटची चव आणि प्रकारांमध्येही विविधता आढळून येते. याचबरोबर जगभरात मिळणाऱ्या चॉकलेट्सच्या किमतीमध्येही फरक आढळून येतात. आपण जाणून घेऊयात जगभरातील सर्वात महागड्या चॉकलेट्सबाबत...

1. वॉसगेस होट चॉकलेट (Vosges Haut Chocolat)

हे चॉकलेट शिकागोमध्ये तयार केले जाते. कटरिना मार्कऑफ यांनी हे चॉकलेट बनवायला सुरूवात केली. हे चॉकलेट आपली खास टेस्ट आणि फ्लेवरसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. याची किंमत जवळपास 6200 रूपये आहे.

2. चॉकोपोलोजिया चॉकलेट ट्रफल बाय फ्रिट्स क्निप्सचिल्ड्ट (Chocopologie Chocolate Truffle by Fritz Knipschildt)

डेन्मार्कचे प्रसिद्ध शेफ फ्रिट्स क्निप्सचिल्ड्ट यांनी या कंपनीची स्थापना 1999मध्ये केली. फ्रिट्स यांनी ला मेडेलाईन ट्रफल तयार करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये 70 टक्के खास प्रकराच्या डार्क चॉकलेट्सचा समावेश असून वेनिलाचा बेस म्हणून वापर केला आहे. या चॉकलेट्सचा समावेश आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चॉकलेटमध्ये केला जातो. फक्त ऑर्डर असेल तरच हे चॉकलेट तयार केले जाते आणि 7 दिवसांतच हे संपवावे लागतात. यांची किंमत जवळपास 79,231 रूपये आहे. 

3. व्हिस्पा गोल्ड चॉकलेट बाय कॅडबरी (Wispa Gold Chocolate by Cadbury)

कॅडबरी चॉकलेट म्हणजे जगप्रसिद्ध चॉकलेटपैकी एक. कॅडबरीने सोन्याचा वर्ख असलेले चॉकलेट लॉन्च केले. ज्याचा समावेश जगभरातील महागड्या चॉकलेट्समध्ये समावेश करण्यात येतो. याची किंमत 1,10,296 रूपये इतकी आहे.

4. ला ग्रॅन्ड लोयुईस XVI बाय डेबायुवे अॅन्ड गलाईस (Le Grand Louis XVI by Debauve and Gallais)

सुलपिस डेबायुवे नावाच्या कंपनीची 1800 मध्ये स्थापना झाली. या कंपनीने सामान्य माणसांसोबतच नेपोलियन फ्रेंच राजांनाही आपले चॉकलेट्स विकले. हे चॉकलेट्स जगभरात डार्क चॉकलेट्ससाठी प्रसिद्ध आहेत. हे तयार करताना यामध्ये 99 टक्के डार्क चॉकलेट्सचा वापर केला जातो. याची किंमत 62,041 रूपये इतकी आहे. 

5. चॉकलेट्स विथ एडिबेल गोल्ड बाय डेलाफी (Chocolates with Edible Gold by DeLafee)

हे चॉकलेट खास करून खाता येईल असे सोने वापरून तयार करण्यात येते. हे स्वित्झर्लंडच्या एका कंपनीमध्ये तयार करण्यात येते. याची किंमत 35,018 रूपये आहे.

 

Web Title: world chocolate day 2018 worlds most precious and expensive chocolates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न