World Chocolate Day : चॉकलेट क्रेझी असाल तर 'या' 5 देशांना नक्की भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2018 11:41 AM2018-07-07T11:41:50+5:302018-07-07T11:44:16+5:30
चॉकलेट हा शब्द ऐकताच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं सर्वांनाच चॉकलेट आवडते. जेवणानंतरचे डेझर्ट असो किंवा एखाद्याचा राग घालवायचा असो. प्रत्येक वेळी चॉकलेट हा उत्तम पर्याय समजला जातो.
चॉकलेट हा शब्द ऐकताच सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. लहान मुलं असो किंवा मोठी माणसं सर्वांनाच चॉकलेट आवडते. जेवणानंतरचे डेझर्ट असो किंवा एखाद्याचा राग घालवायचा असो. प्रत्येक वेळी चॉकलेट हा उत्तम पर्याय समजला जातो. दरवर्षी 7 जुलै हा दिवस वर्ल्ड चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आम्ही तुम्हाला अशा काही देशांची नावे सांगणार आहोत, ज्या देशांना चॉकलेट प्रेमींनी एकदा तरी भेट द्यायलाच हवी. या सर्व देशांत बनविण्यात येणारे चॉकलेट संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या जगप्रसिद्ध चॉकलेट्सची चव चाखण्यासाठी या देशांना नक्की भेट द्या...
1 बेल्जिअम
चॉकलेटचे नाव ऐकताच सर्वांच्या मनात एकाच देशाचे नाव येते ते म्हणजे बेल्जिअम. आपल्या खास चॉकलेट आणि त्याच्या डिझाइनसाठी हा देश संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. येथे मिळणारे ब्रूसेल्स चॉकलेट एकदा तरी चाखायला हवेच. या देशाच्या चॉकलेट्सची चव चाखण्यासाठी सामान्यांपासून अनेक सेलिब्रिटीही उत्सुक असतात. आपली ओळख संपूर्ण जगभरात पोहचवण्यासाठी येथील सरकारने आपल्या चॉकलेट्सचा स्टॅम्प देखील बनवून घेतला आहे.
2 स्वित्झर्लन्ड
भारतीय चित्रपटांमधील जास्तजास्त रोमॅन्टीक सीन्सचे चित्रिकरण हे या देशात होते. या देशातील नैसर्गिक सौंदर्याप्रमाणेच या देशातील चॉकलेट्सही जगप्रसिद्ध आहेत. या देशात तुम्हा जगभरात मिळणारे सर्व प्रकारचे प्रसिद्ध चॉकलेट स्वस्त किमतीमध्ये मिळतील. येथे चॉकलेट तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी कोका पावडर तयार करण्यासाठी लागणाऱ्या कोकोच्या बिया विशेष लक्ष देऊन निवडल्या जातात. यामागील मुख्य हेतू हाच असतो की, चॉकलेटच्या चवीमध्ये कोणताही फरक पडता कामा नये.
3. जर्मनी
जर्मनीसुद्धा चॉकलेट प्रेमींसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. या देशात तुम्हाला चॉकलेटसोबतच मार्शमेलोचे वेगवेगळे प्रकारसुद्धा चाखायला मिळतील. या देशात एक चॉकलेट म्युझिअमदेखील उभारण्यात आले असून इथे तुम्हाला तुम्हाला सर्व जुन्या चॉकलेट्सबद्दल माहिती मिळते. हे म्युझिअम 1993मध्ये उभारण्यात आले आहे. येथे तुम्हाला चॉकलेट बनवायला देखील शिकवले जाते.
4. उटी
भारतातील सर्वात लोकप्रिय हनिमून डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणजे उटी हिल स्टेशन. उटीसुद्धा चॉकलेटसाठी प्रसिद्ध असून तुम्हाला येथे हॅन्डमेड चॉकलेट्स मोठया प्रमाणावर चाखायला मिळतील. त्यातुलनेने येथे मशिनमेड चॉकलेट फार कमी मिळतात. या चॉकलेट्समध्ये शेंगदाणे आणि ड्रायफ्रुट्सचा वापर केला जातो.
5. न्यूयॉर्क
अमेरिकेती न्यूयॉर्क सिटीदेखील चॉकलेट सिटी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणचे व्हाईट चॉकलेट्सचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पहायला मिळतात. या देशात चॉकलेट्सचे वेगळे मार्केटदेखील आहे.