नवी दिल्ली : अ.भा. फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) माजी कर्णधार आय. एम. विजयन यांच्या नावाची पद्मश्रीसाठी शिफारस केली आहे. ५१ वर्षांचे विजयन यांनी देशासाठी ७९ सामन्यात ४० गोल केले आहेत. २००३ ला त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. १९९३, १९९७ आणि १९९९ ला त्यांना देशाचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत सेलन मन्ना (१९७१), चुन्नी गोस्वामी (१९८३), पीके बनर्जी (१९९०), बाईचुंग भूतिया (२००८), सुनील छेत्री (२०१९) आणि बेमबेम देवी (२०२०) या फुटबॉलपटूंना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. केरळच्या त्रिचूर शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान सोडा विकणारे विजयन यांनी वयाच्या १७ व्या वर्षी केरळ पोलीस संघाकडून सुरुवात केली. मोहन बगान, एसफी कोच्ची आमि जेसीटी मिल्ससाठीही ते खेळले.
विजयन यांची पद्मश्रीसाठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:49 PM