ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंटच्या 61 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 03:38 PM2018-12-02T15:38:43+5:302018-12-02T15:40:00+5:30
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारी युव्हेंटस क्लबकडून विक्रमी गोल केला.
माद्रिदः जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रविवारी युव्हेंटस क्लबकडून विक्रमी गोल केला. युव्हेंटस क्लबने रविवारी सीरि A स्पर्धेत फिओरेंटीना क्लबवर 3-0 असा विजय मिळवत जेतेपदाच्या दिशेने 11 गुणांची मोठी आघाडी घेतली. या सामन्यात रोनाल्डोने 79व्या मिनिटाला गोल करत विक्रमी कामगिरी केली. 61 वर्षांपूर्वी दिग्गज फुटबॉलपटून जॉन चार्लेस यांनी नोंदवलेल्या विक्रमाशी बरोबरी केली.
रेयाल माद्रिद क्लबच्या माजी खेळाडूला युव्हेंटसकडून सुरुवातीला दर्जेदार खेळ करण्यात अडचण येत होती. मात्र, त्याने लय मिळवत गोल धडाका लावला. रोनाल्डोने युव्हेंटसकडून सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये 13 सामन्यांत 9 गोल केले होते. सीरि A स्पर्धेत जीओनाच्या किर्झीस्तोफ पिएटेक याच्यानंतर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोनाल्डो दुसऱ्या स्थानी होता. रविवारच्या सामन्यात रोनाल्डोने एक गोल केला आणि त्याच्या नावावर 14 सामन्यांत 10 गोल झाले आहेत. युव्हेंटसनेही 14 सामन्यांत 40 गुणांसह जेतेपद कायम राखण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे.
🔥 @Cristiano becomes the first debut-season Bianconero to net 1️⃣0️⃣ @SerieA goals after 14 games since the great John Charles in 1957/58 ⚽️#ForzaJuve#CR7JUVEpic.twitter.com/jy5Pv2BW4c
— JuventusFC (@juventusfcen) December 1, 2018
युव्हेंटसकडून 14 सामन्यांत 10 गोल करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. 1957 साली चार्लेस यांनी 14 सामन्यांत गोल्सचा दुहेरी आकडा गाठला होता.
10 - Prior to Cristiano Ronaldo, the last Juventus player able to score at least 10 goals in his first Serie A season after MD14 was John Charles in 1957/58. Legend.#FiorentinaJuventus#SerieApic.twitter.com/ByuEe1JtRn
— OptaPaolo (@OptaPaolo) December 1, 2018
या कामगिरीमुळे रोनाल्डोची गोल करण्याची भुक अद्याप संपलेली नसल्याची प्रचिती येते. युव्हेंटसच्या या सामन्यातर रॉड्रीगो बेंटांक्यूर (31 मि.) आणि जिओर्जिओ चिएलीनी ( 69 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. 79व्या मिनिटाला युव्हेंटसला पेनल्टी देण्यात आली आणि त्यावर रोनाल्डोने गोल केला.
Ronaldo is at the top shining more than ever! pic.twitter.com/DiRs02JfFE
— Any Brañez (@anybpresley) December 2, 2018