2030 च्या Fifa World Cup स्पर्धेसाठी इंग्लंडची मोर्चेबांधणी,पण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:21 PM2018-08-02T15:21:34+5:302018-08-02T15:33:26+5:30

2030च्या Fifa World Cup स्पर्धेच्या यजमानपदासाठी इंग्लंडने कंबर कसली आहे.

England Contemplates Bidding For 2030 World Cup Hosting Right | 2030 च्या Fifa World Cup स्पर्धेसाठी इंग्लंडची मोर्चेबांधणी,पण

2030 च्या Fifa World Cup स्पर्धेसाठी इंग्लंडची मोर्चेबांधणी,पण

Next

लंडन - 2030च्या Fifa World Cup स्पर्धेच्या यजमानपदासाठी इंग्लंडने कंबर कसली आहे. फुटबॉल असोसिएशनचे प्रमुख ग्रेग क्लार्क यांनी 2030च्या स्पर्धा आयोजनासाठी इंग्लंड उत्सुक असल्याची माहिती दिली. या स्पर्धेसाठीच्या बोली प्रक्रियेला अद्याप सुरूवात झाली नसली तरी उरूग्वेनेही स्पर्धा आयोजनासाठी उत्सुकता दर्शवली आहे. 1930 साली पहिला फुटबॉल विश्वचषक उरूग्वे येथे खेळवण्यात आला होता आणि 2030 मध्ये या स्पर्धेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळ उरूग्वे पुन्हा इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी जोमाने प्रयत्न करतील, हे नक्की.

1996 नंतर इंग्लंडमध्ये एकही महत्त्वाची स्पर्धा झालेली नाही. 1966च्या फुटबॉल विश्वचषक आयोजनानंतर 96 मध्ये इंग्लंडमध्ये युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा झाली होती. त्यामुळे 34 वर्षांनंतर इंग्लंड फिफाची आणखी एक महत्त्वाची स्पर्धा आयोजित करू इच्छितो. क्लार्क म्हणाले,' 2030च्या विश्वचषक स्पर्धेचे आयोजनपद मिळवण्यासाठी सरकारनेही सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. यावर चर्चा सुरू आहे आणि 2019 मध्ये याबाबतची घोषणा करण्यात येईल.'



इंग्लंडने 2018च्या विश्वचषक आयोजनासाठीही प्रयत्न केले होते, परंतु त्यांना अपयश आले. त्यात 2022च्या विश्वचषक स्पर्धेवर संकटाचे ढग आहेत. कतारने या आयोजन प्रक्रियेत फिफाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोव आहे. त्यात कतार दोषी आढळल्यात त्यांच्याकडून यजमानपदाचा मान काढून घेतला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत 2022च्या विश्वचषक आयोजनासाठी इंग्लंडने तयारी दर्शवली आहे. 
 

Web Title: England Contemplates Bidding For 2030 World Cup Hosting Right

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.