: नवी मुंबई येथे 2 फेब्रुवारी 2019 या दिवशी होणाऱ्या फादर आग्नेल मल्टीपर्पज स्कूल व ज्युनुयर कॉलेज होणाऱ्या ‘ग्लोबल गोल्स वर्ल्ड कप’मध्ये फोर्सा गोवा फाउंडेशन सहभाग घेणार आहे.
ग्लोबल गोल्स वर्ल्ड कप हा पूर्ण जगात होतो. हौशी एथलिट्सना संयुक्त राष्ट्राच्या 17 नियमांवलीमधून शाश्वत विकासासाठी या साम्यांमध्ये एफसी गोवाच्या महिला संघाने भाग घेतला. या संघात महिला एफसी गोवा संघाचे खेळाडू तसेच अतर काही खेळाडू असणार आहेत. संघाचे परिक्षण गोलच्या आकड्यांव्यतिरिक्त त्यांनी पाडलेला प्रभाव व शाश्वत विकासासाठी करण्यात येणाऱ्या जागृतीच्या माध्यमाने त्यांना विजेते घोषिक करण्यात येणार आहे. फोर्सा गोवा फाउंडेशन ही एफसी गोवाची भाग आहे व सकारात्मक विकासासाठी फुटबॉचा वापर करते. फाउंडेशन विविध उपक्रमातून शाश्वत विकास साध्य करण्याठई प्रयत्नशीन असते. ग्लोबल गोल्स वर्ल्ड कपमध्ये गोव्यातून सहभागी होणारा हा एकमेव संघ आहे.
फोर्सा गोवा फाउंडेशनबद्दल बोलताना इशिता गुदिनो म्हणाली “एफसी गोवा व फोर्सा गोवा फाउंडेशन हे नेहमीच फुटबॉचा विस्तार करून समुहावर सकारात्मक प्रभाव पाडण्यावर भर देतो. या वर्ल्ड कपचेदेखील हेच उद्दीष्ट आहे. आम्ही मुलींच्या फुटबॉल प्रगतीसाठी देखील झटत असतो व या स्पर्धेमुळे आम्हाला आमची मेहनत सादर करण्यासाठी एक मंच मिळाला आहे. ”
हा उपक्रम यूएनडिपी, इआयआर सोकर व सस्टेनेबल माइंड्यच्या सहकार्याने सयुक्त राष्ट्राच्या शाश्वत ध्येय पूर्तीनिमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. अजूनपर्यंत 10 ग्लोबल गोल वर्ल्ड कप झालेले आहेत व ही स्पर्धा प्रथमच भारतात होणार आहे.