नोव्हगोरोड : स्पार्टक स्टेडियमवर सुरू असेलल्या ‘ई’ गटातील सामन्यात ३६ व्या मिनिटाला जुझे पावलिन्हो याने शानदार गोल नोंदवला. या गोलच्या बळावर पाच वेळा विश्वचॅम्पियन झालेल्या ब्राझील संघाने सर्बियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती.
उपउपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासाठी ब्राझीलला केवळ अनिर्णित निकालाची गरज आहे. असे असताना ब्राझीलने सर्बियाविरुद्ध नेहमीपेक्षा वेगळीच व्यूव्हरचना आखली. सामन्याच्या सुरुवातीपासून ब्राझीलने अतंत्य शांत आणि संयमी खेळ केला. प्रतिस्पर्धी संघालाही त्यांनी संधी मिळू दिल्या नाहीत. उलट ब्राझीलला पहिल्या हाफमध्ये तीन-चार संधी मिळाल्या होत्या. स्टार खेळाडू नेयमार यानेही संधी दवडल्या. सामन्यात १७ व्या मिनिटापर्यंत चेंडू मध्यभागातच होता. ब्राझील जणू पासिंगचा सराव करीत असल्याचे जाणवत होते. ते संधीच्या शोधात होते. २४ व्या मिनिटाला मिळालेली संधीसुद्धा नेयमारने घालवली. जर्सी नंबर ९ या खेळाडूने नेयमारला पास दिला होता. यावर नेयमारने डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर चेंडूला गोलरक्षकाने ढकलून दिशाहीन ठरवले. ३५ व्या मिनिटाला कुतिन्होने बचावपटूंना भेदत धावत येत चेंडू पावलिन्होकडे दिला. चेंडू उसळल्याने पावलिन्हो याने गोलरक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला जाळीत ढकललेआणि ब्राझीलने आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत कायम राखली.
असा आहे रेकॉर्ड...गेल्या चार विश्वचषकांच्या साखळी सामन्यांत ब्राझीलने एकही सामना गमावला नाही. हा त्यांचा विक्रमच आहे. त्यांनी विश्वचषकाच्या साखळीत आतापर्यंत ३८ सामने खेळले आहेत. त्यांनी २९ सामने जिंकले आणि आठ ड्रॉ केले. सर्बियाविरुद्धदेखील त्यांना विजय किंवा ड्रॉची गरज होती. ब्राझीलचा स्वित्झर्लंडविरुद्ध पहिला सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. दुसºया सामन्यात त्यांनी कोस्टारिकाला २-० ने पराभूत केले होते. या दोघांतील गेल्या चार सामन्यांत ब्राझीलने एक सामना जिंकला आहे. तर तीन बरोबरीवर आटोपले. ब्राझीलने सर्बियाविरुद्ध ४ तर सबिर्याने ब्राझीलविरुद्ध २ गोल नोंदवले होते.