FIFA FOOTBALL World Cup 2018: डेन्मार्क अव्वल स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 07:45 PM2018-06-21T19:45:59+5:302018-06-21T19:45:59+5:30
पहिल्या सत्रात 1-1 अशी बरोबरी झाल्यावर दुसऱ्या सत्रात मात्र दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही.
मॉस्को : डेन्मार्कने आपल्या फुटबॉल विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशी 1-1 अशी बरोबरी साधली. या बरोबरीसह डेन्मार्कने ' क ' गटात अव्वल स्थान पटकावले आहे. डेन्मार्कने आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये अपराजित राहण्याचा विक्रम केला आहे.
A first point of the 2018 #WorldCup for the @Socceroos, while @dbulandshold maintain their unbeaten run in Group C...#DENAUSpic.twitter.com/iVhv0ok4aS
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 21, 2018
डेन्मार्कने सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार आक्रमण लगावले होते. आपल्या या रणनितीमध्ये त्यांना सातव्याच मिनिटाला यश आले. सामन्याच्या सातव्या मिनिटाला ख्रिस एरिक्सनने जोरदार गोल लगावत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी डेन्मार्कला अर्धातास टिकवता आली. कारण त्यानंतर सामन्याच्या 38व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिले जेडीनॅकने गोल करत संघाला 1-1 अशी बरोबरी करून दिली.
Key stats:
— FIFA World Cup 🏆 (@FIFAWorldCup) June 21, 2018
👉 #DEN extend their unbeaten record to 17 matches
👉 #AUS end a losing streak of four matches at the #WorldCup#DENAUSpic.twitter.com/0qjnyXhLlb
पहिल्या सत्रात 1-1 अशी बरोबरी झाल्यावर दुसऱ्या सत्रात मात्र दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांकडून चांगले आक्रमण पाहायला मिळाले. काही वेळा दोन्ही संघांना गोल करण्याच्या संधीही मिळाल्या, पण दोन्ही संघांना या संधीचे रुपांतर गोलमध्ये करता आले नाही.