मॉस्को : स्पेन आणि मोरॅक्को यांच्यातील फुटबॉल विश्वचषकातील सामन्याचे पहिले सत्र चुरशीचे झाले. मोरॅक्कोने चौदाव्या मिनिटाला पहिला गोल करत सर्वांनाच जोरदार धक्का दिला. पण त्यानंतर पाच मिनिटांनीच स्पेनने गोल करत बरोबरी केला.
सामन्याच्या सुरुवातीला स्पेनचा संघ अधिक बचावात्मक वाटला. या गोष्टीला फायदा मोरॅक्कोच्या संघाने उचलला. सामन्याच्या 14व्या मिनिटाला खलिद बोऊतैबने मोरॅक्कोसाठी पहिला गोल केला. त्यावेळी मोरॅक्कोच्या संघाने केलेले सेलिब्रेशन नजरेचे पारणे फेडणारे होते. पण त्यांचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही.
आपल्यावर गोल झाल्यावर मात्र स्पेनने बचाव करणे टाळत आक्रमणावर भर दिला. त्यामुळे पहिला गोल स्वीकारल्यावर स्पेनच्या संघाला त्याची फक्त पाच मिनिटांत परतफेड करता आली. स्पेनच्या इस्कोने गोल केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.