ललित झांबरे : यंदाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अनेक अर्थांनी विशेष ठरत आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 23 सामने खेळले गेले आहेत आणि त्यापैकी प्रत्येक सामन्यात किमान एकतरी गोल झालेला आहे.
1954 नंतर म्हणजे तब्बल 64 वर्षात विश्वचषकात प्रथमच असे घडले आहे. स्वीत्झर्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या 1954 च्या त्या विश्वचषकात 26 सामने खेळले गेले. त्यापैकी प्रत्येक सामन्यात किमान एक तरी गोल नोंदला गेला. त्या स्पर्धेतील 26 सामन्यात 140 गोल नोंदले गेले. म्हणजे प्रतीसामना सरासरी 5.4 गोल झाले. विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वाधिक सरासरी आहे.
त्यानंतर यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत प्रत्येक सामन्यात किमान एक तरी गोल होऊन 23 सामन्यात 51 गोल झाले आहेत. ही सरासरी 2.22 पडते. त्यामुळे यंदा आता आणखी चार सामन्यात गोल झाला तर 1954 चा विक्रम मोडीत निघेल मात्र, त्यावेळचा प्रती सामना सरासरी 5.4 गोलांचा विक्रम मोडला जाणे अवघड आहे.
विश्वचषक सामन्यांतील गोलांची सरासरी
वर्ष गोल सरासरी
2018* 51 2.2 2014 171 2.7 2010 145 2.32006 147 2.32002 161 2.51998 171 2.71994 141 2.7 1990 115 2.21986 132 2.51982 146 2.81978 102 2.71974 97 2.61970 95 3.01966 89 2.81962 89 2.81958 126 3.61954 140 5.41950 88 4.01938 84 4.71934 70 4.11930 70 3.9*अद्याप सामने बाकी...