FIFA Football World Cup 2018 : विश्वचषक स्टेटियममध्ये कसा दाखल होतो, पाहा हा व्हीडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:03 PM2018-07-15T18:03:43+5:302018-07-15T18:05:42+5:30
विश्वचषक नेमका स्टेडियममध्ये येतो कसा, विश्वचषकाला किती सुरक्षा दिली जाते, तो किती जपला जातो, याची उत्सुकता तुम्हाला असेलंच.
मॉस्को : काही तासांमध्येच आपल्या समजेल की विश्वचषक नेमका कुणी जिंकला. पण यावेळी जो विजेता संघ विश्वचषक उंचावणार आहे तो नेमका स्टेडियममध्ये येतो कसा, विश्वचषकाला किती सुरक्षा दिली जाते, तो किती जपला जातो, याची उत्सुकता तुम्हाला असेलंच. फिफानेही आपल्या चाहत्यांसाठी विश्वचषक स्टेडियममध्ये कसा नेला जातो, याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
The Trophy has arrived at Moscow's Luzhniki Stadium... #WorldCupFinalpic.twitter.com/2ubabJaBFy
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 15, 2018
फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. फ्रान्सने यापूर्वीही विश्वचषकाला गवसणी घातली होती. पण क्रोएशियाचा संघ मात्र पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे क्रोएशिया इतिहास रचणार की फ्रान्स आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.