मॉस्को : बलाढ्य संघाशी यापुढे आपल्याला सामना करायला नको, असे बऱ्याच जणांना वाटत असते. असेच काहीसे सध्याच्या घडीला क्रोएशियाच्या संघाला वाटत आहे. साखळी फेरीत त्यांनी अर्जेंटीनाला 3-0 अशा फरकाने पराभूत केले. पण आता बाद फेरीत अर्जेंटीनाचा सामना करायला लागू नये, त्यासाठी अर्जेंटीनाचा क्रोएशिया 'असा' करणार 'गेम' करणार आहे. पण हा गेम नक्कीच काय असेल आणि त्यामुळे मेस्सीचे काय होईल, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.
अर्जेंटीनाला पहिल्या सामन्यात आईसलँडबरोबर 1-1 अशी बरोबरी स्वीकारावी लागली होती. हा सामना अर्जेंटीनाचा संघ सहज जिंकेल, असे चाहत्यांना वाटले होते. मेस्सीची या सामन्यात वाईच कामगिरी झाली होती. आईसलँडबरोबर 1-1 अशी बरोबरी झाल्यावर अर्जेंटीना क्रोएशियाला पराभूत करून विश्वचषकातील पहिला विजय मिळवेल, असे वाटले होते. पण क्रोएशियानेच त्यांना 3-0 असे पराभूत केले आणि अर्जेंटीनाला मोठा धक्का बसला. पण अर्जेंटीनाला पराभूत झाल्यावरही त्यांचा गेम करायचे क्रोएशियाने ठरवले आहे. पण ते हा गेम कसा करणार, हे पाहूया.
क्रोएशियाचा आगामी सामना आईसलँडबरोबर होणार आहे. हा सामना जर आईसलँडने जिंकला तर अर्जेंटीनाला बाद फेरीत पोहोचता येणार नाही. त्यामुळे आईसलँडविद्धच्या सामन्यात महत्त्वाचे खेळाडू न उतरवता त्यांना हा सामना जिंकवायला द्यायचा आणि अर्जेंटीनाचा गेम करायचा, असे क्रोएशियाचे प्रशिक्षक झ्लॅटको डॅलिक यांनी स्पष्ट केले आहे.