FIFA Football World Cup 2018 : यंदाच्या विश्वचषकात तुटला पेनल्टी कीकचा रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 06:39 PM2018-06-26T18:39:33+5:302018-06-26T18:39:47+5:30
यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत नवनव्या विक्रमांची नोंद होत आहे.
कॉलिनग्राड - यंदाच्या फिफा विश्वचषक स्पर्धेत नवनव्या विक्रमांची नोंद होत आहे. मंगळवारी इराण आणि पोर्तुगाल यांच्यात झालेल्या लढतीदरम्यान असाच एक विक्रम नोंदवला. या सामन्या देण्यात आलेली पेनल्टी कीक ही यंदाच्या स्पर्धेत देण्यात आलेली 19वी पेनल्टी कीक ठरली. याआधीच्या सर्व विश्वचषक स्पर्धांच्या तुलनेत या विश्वचषकात देण्यात आलेल्या पेनल्टी कीकची संख्या अधिक आहे.
इराण आणि पोर्तुगाल यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये व्हिडिओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) च्या मदतीने पोर्तुगालला गोल करण्याची संधी मिळाली. ही या विश्वचषकात देण्यात आलेली 19 वी पेनल्टी होती. मात्र स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो या पेनल्टी कीकचा लाभ घेऊन गोल करू शकला नाही. मात्र या पेनल्टी कीकसोबत विश्वचषकातील जुने रेकॉर्ड तुटले.
याआधी 2014 साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत एकूण 13 पेनल्टी कीक देण्यात आल्या होत्या. तर 1990 साली झालेल्या विश्वचषकात 18 पेनल्टी कीक देण्यात आल्या होत्या.