मॉस्को - फिफा विश्वचषक स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी जगभरातील फुटबॉल प्रेमींनी सध्या रशियात गर्दी केली आहे. अनेकजण आपला आवडता संघ आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी मैदानांवर गर्दी करत आहेत. पण काही परदेशी फॅन्स मात्र फुटबॉलपेक्षा रशियन तरुणींशी प्रेमसंबंध जुळवण्यासाठी त्यांचे मोबाइल नंबर मिळवण्यात व्यस्त आहेत. अर्जेंटिनाहून आलेला ऑगस्टिव ओटेलो याच फॅन्सपैकी एक आहे. तो आपला संघाचे गोल मोजण्यापेक्षा आतापर्यंत किती मुलींचे फोन नंबर मिळवलेत हे मोजण्यात व्यस्त आहे. ओटेलो याने आतापर्यंत चार मुलींचे फोन नंबर मिळवण्यात यश मिळवले आहे. मुलींचे अधिकाधिक नंबर कोण मिळवेल यावरून तो आणि त्याच्या मित्रांममध्ये सध्या स्पर्धा सुरू आहे. दरम्यान आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा फायदा होऊन मुली आपल्याकडे आकर्षित होतील, असे त्याला वाटते. तसेच जगभरातून मोठ्या प्रमाणावर पुरुष रशियात आल्याने मुलींशी जवळीक साधण्यास इच्छुक असणाऱ्यांना तगड्या स्पर्धेचा सामना करावा लागत असल्याचेही तो सांगतो. फिफा विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाल्यावर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी देशातील महिलांना विश्वचषक पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पुरुषांसोबत संबंध ठेवण्याची परवानगी दिली होती. रशियातील महिला जगातील सर्वश्रेष्ठ महिला आहेत. परदेशी पुरुषांसोबत संबंध ठेवण्याचा निर्णय रशियातील महिलांनी स्वत याबाबत निर्णय घ्यावा, असे पुतीन यांचे प्रवक्ते दमित्री पेस्को यांनी म्हटले होते. क्रॉस ब्रिडने जन्माला येणाऱ्या मुलांचा त्यांना एकट्याने सांभाळ करावा लागू शकतो. त्यामुळे रशियन महिलांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यान परदेशी पुरुषांची संबंध ठेवू नयेत, असा सल्ला, रशियातील एका महिला खासदारांनी दिला होता. त्यानंतर पुतीन यांनी ही परवानगी दिली होती.
Fifa World Cup 2018 : गोल मोजण्यात नाही तर रशियन तरुणींचे नंबर मिळवण्यात बिझी आहेत फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 1:40 PM